मुंबई : रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील रणबीरच्या लूकचं चाहत्यांनी, सेलिब्रिटींनी प्रचंड कौतुक केलंय. त्यामुळेच की काय रणबीर आता जो दिसेल त्याला अभिनयाचे धडे देऊ लागलाय. रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटाचा ट्रेलर बघून रणबीरचं सगळीकडेचं कौतुक होतंय. आपली स्तुती ऐकून रणबीर इतका खूश झालाय की तो आता दुसऱ्यांना अॅक्टिंग शिकवू लागलाय. असं वाटतंय की रणबीर आपल्या सिनेमात आता क्रिकेटर्सलाही घेणार आहे. त्यामुळेचं तर इथे त्यांची स्क्रिन टेस्ट चालू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडिओमध्ये रणबीर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेटली आणि माइकल क्लार्कला अॅक्टींगचे धडे देताना दिसतोय..रणबीरचा हा सगळा फंडा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरु आहे. ब्रेटली आणि मायकल क्लार्क बरोबरचा रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हारल झालाय.


रणबीरने त्याच्या आगामी सिनेमा 'संजू'साठी अॅक्टींग आणि आपल्या लुकवर खूपचं मेहनत घेतलीय. पण, याचा अर्थ असा नाही की रणबीर तू स्वत:ला अॅक्टिंगचा देव मानावं आणि असंच दुसऱ्यांना अॅक्टिंगचं ज्ञान देणं सुरूचं ठेवावं. रणबीरचा 'संजू'हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. हा सगळा ड्रामा त्याच्या 'संजू' ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चाललाय... करीनानं तर ट्रेलर पाहताच रणबीरच्या अभिनयाची स्तुती केलीय.


जूनमध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं प्रमोशन  जोरात चाललंय. या सिनेमाचा आणखी एक पोस्टर रिलीज झालाय. ज्यात रणबीर संजय दत्तची फोटोकॉपीचं वाटतोय... सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहिल्यानंतर रणबीरच्या या सिनेमाकडुन प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनचं वाढल्यात.. आता रणबीर प्रेक्षकांच्या ह्या अपेक्षा पूर्ण करतो का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.