मित्राच्याच प्रेयसीशी अभिनेता झाला इंटिमेट; त्याच्या कबुलीमुळं बॉलिवूड हादरलं
अभिनेत्याच्या त्या नात्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण, कोण आहे तो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता?
मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नातं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. बॉलिवूडच्या रंगीत विश्वात रिलेशनशिपच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अभिनेते आणि अभिनेत्री यांचे ब्रेकअप त्यांनंतर जीवनात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होते. या सर्व गोष्टी सेलिब्रिटींसाठी सर्वसाधारण असल्या तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. अभिनेता रणबीर कपूरने एका शो दरम्यान त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.
रणबीरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत इंटिमेट झाला. शिवाया या गोष्टीचा स्वीकार त्याने नॅशनल टीव्हीवर देखील केला. रणबीर कपूरने दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये रिलेशनशिपबद्दल खुलासा केला.
रणबीर कपूरने बॉलिवडच्या अनेक अभिनेत्यांना डेट केलं आहे. त्याचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथे पेक्षा कमी नाही. रणबीरच्या गर्लफ्रेंडच्या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री कतरीना कैफ देखील आहे. याच गोष्टीचा स्वीकार त्याने शोमध्ये केला.
आता रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. अनेकदा त्यांनी प्रेमाची कबुली देखील दिली. चाहत्यांनी आलिया आणि रणबीरच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं.
दोघांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर सध्या आलिया तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमामुळे चर्चेत आहे.