Ranbir Kapoor Groom : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रामायण’ ला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, या दरम्यान रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात तो पुन्हा एकदा बोहल्यावर चढल्याचे पाहायला मिळत आहे. रणबीरचा हा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण रणबीरनं शेरवानी, डोक्यावर फेटा आणि दुपट्टासोबत एन्ट्री पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. रणबीरच्या या नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर पुन्हा एकदा नवरदेवच्या लूकमध्ये दिसला आहे. यावेळी रणबीर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या फॅशन इव्हेंटमध्ये लोकप्रिय डिझायनर तरुण तहिलियानीसाठी शो स्टॉपर म्हणून दिसला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की रणबीर कपूरनं आयवरी आणि ब्लश पिंक शेरवानी आणि दुपट्टा घेतला आहे. त्यासोबत डोक्यावर फेटा घातलेला आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी रणबीरनं गुलाबी रंगाची मोजडी घातली आहे. नवरदेव झालेला रणबीर गाडीत त्याच्या वरातीसोहत डान्स करताना दिसतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रणबीरला पुन्हा एकदा नवरदेव होऊन रॅम्पवर वॉक करताना पाहून वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. रणबीरचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. रणबीरच्या या लूकला नेटकऱ्यांनी रॉयल म्हटलं आहे आणि असं देखील सांगितलं. रणबीरच्या शोमध्ये एन्ट्री पाहता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानं चक्क एका लग्झरियस गाडीतून एन्ट्री घेतली आहे. इतकंच नाही तर रणबीरसोबत ढोल वाजवत वरातीनं एन्ट्री केली आहे. रणबीर देखील स्वत: ला थांबवून शकला नाही आणि तो देखील यावेळी डान्स करु लागला. 


हेही वाचा : विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल


रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं 2022 मध्ये सप्तपदी घेतल्या. त्यांनी त्यांच्या मुंबईच्या घरी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. त्यांच्या लग्नानंतर काही महिन्यांमध्ये राहाचा जन्म झाला. राहाचे फोटो पाहून चाहते उत्साही झाले होते.