विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल

Vivek Oberoi on Bishnoi Community:  विवेक ओबेरॉयनं जेव्हा बिश्नोई समाजाची केली होती स्तुती... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 14, 2024, 06:41 PM IST
विवेक ओबेरॉयनं केली बिश्नोई समाजाची स्तुती! म्हणाला, 'त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्यापेक्षा मोठं...', VIDEO व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Vivek Oberoi on Bishnoi Community: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. प्रत्येकवेळी काही वेगळ्या कारणासाठी तो चर्चेत असतो. आता त्याचं चर्चेत असण्याचं कारण काही वेगळंच आहे. ते म्हणजे सोशल मीडियावर विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत विवेक हा बिश्नोई समाजची स्तुती करताना दिसला. व्हिडीओत तो म्हणाला की 'बिश्नोई समाजाची इतकी चांगली संस्कृती आहे. हे संपूर्ण जगात पसरायला हवं. हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं.'

विवेकचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. एकदा जेव्हा विवेक बिश्नोई समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते तेव्हा त्यानं या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानं सांगितलं की 'मला इतकं कळलं की बिश्नोई समाजाचं प्रेम असं आहे की जे एकदा झालं की कोणाला त्यातून बाहेर पडणार नाही. मी राजस्थानमध्ये लहाणाचा मोठा झालोय. राजस्थानच्या मातीवर माझं खूप प्रेम आहे. खूप सुंदर आठवणी आहेत. दाल-बाटी चूरमा, केर सांगरी हे सगळे पदार्थ खाऊन मोठे झालो आहोत. माझे खूप बिश्नोई मित्र होते, क्यासमेट होते, पण तीन दिवस आधीच मला बिश्नोई समाजाविषयी कळलं, आता पर्यंत तर हे वाटायचं की बिश्नोई एक आडनाव आहे. पण पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की बिश्नोई समाज काय आहे तेव्हा मला आश्चर्य झालं होतं.'

विवेकनं पुढे सांगितलं की 'लोकांनी खूप वेगळ्या-वेगळ्या मिशनसाठी त्यांचं आयुष्य दिलं. त्यांना सलाम, पण झाडांना वाचवण्यासाठी बिश्नोई समाजानं जे बलिदान दिलं आहे त्यापेक्षा मोठं बलिदान हे जगात कोणी देऊ शकत नाही. आम्ही जेव्हा अमृता देवीची गोष्ट वाचली होती, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्यां मुलींनी ज्या प्रकारे बलिदान दिलं ते आजही लोकांच्या लक्षात आहे, खरंतर त्यावर चित्रपट तयार झाला पाहिजे.'

हेही वाचा : 'सासूसोबत ठेवायचे होते शारिरीक संबंध'; रॅपरच्या असिस्‍टेंटचे धक्कादायक खुलासे, म्हणाली, 'मला ड्रग्स दिले अन्...'

विवेकनं त्याचं म्हणणं संपवल्यानंतर सांगितलं की 'आपण गायीच दूध आपल्या मुलांना प्यायला देतो. या जगात फक्त एकच समाज आहे, बिश्नोई समुदाय, जिथे जर एक हरण मेलं, तर त्याच्या पिल्लाला बिश्नोई समाजातील महिला या त्यांचं दूध पाजतात आणि त्यांना स्वत: च्या बाळाप्रमाणे जपतात. हे तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही.'