मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या रिलेशनशिपबद्दल सर्वांना माहिती आहे. अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी एका कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. आलिया आणि रणबीर कोणत्याही ठिकाणी दिसले तरी चाहते त्यांना घेरतात. त्यांच्या भोवती सतत चाहत्यांची गर्दी असते. आता देखील आलिया-रणबीरला गर्दीमध्ये स्पॉट करण्यात आलं. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आलिया तिच्या काही मैत्रिंणीसोबत डिनर पार्टी  झाल्यानंतर बाहेर पडते. त्यानंतर आलियाची एक मैत्रीण तिला कारपर्यंत सोडण्यासाठी येते. नंतर आलिया तिच्या कारकडे वळते जिथे तिच्या मागे चाहत्यांची मोठी गर्दी जमते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यादरम्यान रणबीर आलियाला सुरक्षित ठेवत कारजवळ आणतो आणि आधी तिला कारमध्ये बसवतो. यानंतर रणबीरही दुसऱ्या बाजूने जातो आणि त्याच कारमध्ये बसतो. अशा प्रकारे चाहत्यांच्या मोठ्या गर्दीमध्ये रणबीर आलिया सांभाळतो. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.