मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या खूप चर्चेत आहे. ज्याचं कारण आहे रणबीर आणि आलियाची लव्ह स्टोरी. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. पुन्हा एकदा असंच काही चित्र पाहायला मिळालं जेव्हा रणबीर कपूर आलियाला घेऊन रुग्णालयात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दोघेही त्यांच्या आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रचं शूटिंग करत आहेत. शूटींगदरम्यान आलिया जखमी झाली. त्यामुळे रणबीर तिला घेऊन रुग्णालयात गेला. मुंबईत एका क्लिनिकच्या बाहेर ते स्पॉ झाले. रणबीर ब्लॅक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे तर आलियाने ब्लॅक टीशर्ट आणि ब्लॅक पँट घातली आहे.



याआधी ब्रह्मास्त्रच्या सेटवरचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोमध्ये रणबीर फोनमध्ये व्यस्त दिसत आहे. बाजुला बसलेली आलिया मात्र यामुळे रागात दिसत आहे. सिनेमाची शूटिंग सध्या मुंबईत सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत आहेत. करण जोहर हा सिनेमा प्रोड्यूस करत आहे. अयान मुख़र्जी या सिनेमाचा दिग्दर्शक आहे.