आलिया आणि नीतू कपूरही सासू-सूनेप्रमाणे भांडतात? रणबीर कपूरचा खुलासा, `त्या इतक्या...`
Alia Bhatt and Neetu Kapoors Relationship : आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचं कसं आहे नातं? त्यांच्यात होतात भांडणं
Alia Bhatt and Neetu Kapoors Relationship : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट जेव्हा केव्हा सासू नीतू कपूर यांच्यासोबत दिसते. तेव्हा त्यांच्यात किती चांगलं बॉन्डिंग आहे यावर चर्चा होते. सोशल मीडियावर देखील एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवतात. पण या सगळ्यावरून एक प्रश्न उपस्थित राहिला आहे की त्या दोघांमध्ये खरंच सगळं ठीक आहे का? जे बॉन्ड ते कॅमेऱ्यासमोर दाखवतात तेच त्यांच्यात आहे का? रणबीर कपूरनं याविषयी खुलासा केला आहे की त्यांच्यात खरं कसं नातं आहे.
कसं आहे सासू-सुनेचं नातं
रणबीर कपूरनं नुकतीच निखिल कामथच्या पॉडकास्टवर अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. त्यावेळी त्यानं आलियाचे त्याच्या आईसोबत आणि अर्थातच संपूर्ण कुटुंबासोबत कसं नातं आहे त्याविषयी सांगितलं आहे. रणबीरनं सांगितलं की 'माझी आई आणि आलियात खूप चांगलं नातं आहे. दोघं एकमेकांसाठी खूप काही आहेत. आलिया तर माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिक माझ्या आईला आहे. या गोष्टीचाच मला खूप आनंद होतो. अनेक महिलांसोबत मी राहिलोय, जसं की माझी आई, माझी बहीण, आलिया आणि राहा. या सगळ्या जगातील बेस्ट वूमन आहेत.'
आलिया नेहमीच देते पाठिंबा
या दरम्यान, रणवीरनं सांगितलं की 'जेव्हा ऋषी कपूर हे आजारी होते तेव्हा आलिया त्याच्यासोबत त्याला साथ देते होती. पुढे तो म्हणाला, जेव्हा मी अमेरिकेत वडिलांचा उपचार करण्यासाठी तेव्हा ती माझ्यासोबतच होती. जर मी रुग्णालयात होतो तर ती देखील माझ्यासोबत होती. तिनं माझ्यासाठी खूप काही केलं आहे.'
हेही वाचा : 'पुष्पा 2' च्या सेटवरून व्हायरल झाला क्लायमॅक्स फाइट सीन? Allu Arjun च्या चाहत्यांना बसला धक्का
आलियासोबत त्याच्या नात्यावर बोलताना रणबीरनं सांगितलं की दोघांनी डेटिंगच्या पहिल्या वर्षी म्हणजे 2018 मध्येच एकत्र राहणं सुरु केलं होतं. लॉकडाऊन दरम्यान, दोघं एकत्रच राहत होतो आणि त्याच दरम्यान, आमचं नातं हे स्ट्रॉंग झालं. अशी कोणती वेळ नव्हती जेव्हा दोघं एकमेकांना कंटाळलो आहे वगैरे. त्या ऐवजी दोघांनी एकत्र ट्रेनिंग घेतलं आणि आनंदानं राहत आहोत. तर त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यापासून आलियानं स्वत: ला लाउड पर्सनपासून थोडं शांत केलं आहे.