मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-वडिल होणार आहे. कपूर कुटूंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे. या दरम्यानच आता रणबीर आणि आलियाच बेडरूम सिक्रेट समोर आलं आहे. हे सिक्रेट एकूण तूमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरने सांगितलं सिक्रेट 
एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आलियाबद्दल (Alia Bhatt) एक मजेशीर खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्याला आलियासोबत झोपणे कठीण जात आहे. यामागचे कारण देखील त्याने सांगितले आहे. 


रणबीरला  (Ranbir Kapoor) मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तो आलियाबद्दल काय सहन करतो. यावर तो म्हणाला की,   आलियासोबत झोपणे कठीण आहे, असे प्रत्युत्तर त्याने बॉलीवूडच्या बबलला दिले होते. तो पुढे म्हणाला की, तिला झोप लागली की, ती तिरपी चालायला लागते. झोपेत असताना आलियाचे डोके एकीकडे असते आणि पाय दुसरीकडे असतात. या दरम्यान त्याला बेडच्या कोपऱ्यावर झोपावे लागते. ही मोठी समस्या असून तो हे सहन करतो असे तो म्हणालाय. 


आलिया काय म्हणाली?
आलियाला (Alia Bhatt) हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आलियाने सांगितले की, तिला रणबीरची शांत राहण्याची सवय आवडते. तो खूप चांगला श्रोता आहे. मात्र, हेच तिला सहन करावे लागत आहे. कारण कधी-कधी तिला रणबीरने उत्तर द्यावे असे वाटते पण तो तसे करत नाही, अशी तिची खंत आहे. 


दरम्यान आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरचं (Ranbir Kapoor) हे सीक्रेट एकूण चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.