Tu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा `तू झुटीं मैं मक्कार` सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा
Tu Jhoothi Main Makkar Review : पोस्टरवरून रोमँटिक वाटणारा सिनेमा वास्तविक तसा नाहीये, सिनेमा पाहताना अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा होतो. रणबीर, श्रद्धासारखी तगडी स्टारकास्ट आहे.
Tu Jhoothi Main Makkar Review : रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि श्रद्धा कपूर (shradhha kapoor) स्टारर तू झुटीं मैं मक्कार सिनेमा काल रिलीज झाला. एकंदरीत सिनेमाच्या पोस्टवरून हा सिनेमा रोमँटिक असेल असं वाटतं. पण सिनेमा पूर्णपणे फॅमिली मुव्ही आहे. सिनेमा कौटुंबिक असला तरी रोमँटिक कॉमेडीने परिपूर्ण आहे. (Tu Jhoothi Main Makkar Review)
दिग्दर्शक लव्ह रंजन त्याच्या खास हटके सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. प्यार का पंचनामा, आय हेट लव्ह स्टोरी सारखे तरुणानां आवडतील असे सिनेमे घेऊन येत असतो . त्याचे याआधीचे सिनेमे प्रेक्षकांना फार आवडले होते. बॉक्स ऑफिसवर चांगली कामेदेखील झाली होती, त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होती, ती अपेक्षा सिनेमाने पूर्ण केली कि नाही हे आपण पुढे वाचूया. (Tu Jhoothi Main Makkar Review )
रोमान्स,मैत्री, प्रेम भावना अशा अनेक गोष्टींची सांगड घालणारा हा सिनेमा आहे, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत . रणबीर कपूर एका श्रीमंत घरातला मुलगा आहे ज्याच्याकडे आधीच खूप बिझनेस आहे. मात्र त्यातही तो त्याचा मित्रांसोबत 'जोडी ब्रेकर्स'
करणारा बिझनेस करतो. याचदरम्यान त्याची ओळख श्रद्धा कपूरसोबत होते. मात्र श्राद्धाला रणबीरच्या जोडी ब्रेकर्स बिझनेसविषयी माहित नसतं, अचानक श्रद्धा, जोडी ब्रेकर्स सर्व्हिस वाल्यांना कॉल करून तिला ब्रेकअप करायचं असल्याचं सांगते. हे ऐकून रणबीरला धक्का बसतो, श्रद्धाला ब्रेकअप का करायचं असतं? तीच ब्रेकअप होतं का ? पुढे या दोघांच्या ल्व्जस्टोरी च काय होतं हे सर्व काही अतिशय रंजकपणे दाखवण्यात आलं आहे ? तीच गम्मत पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा एकदा जरूर पाहावा लागणार आहे. (Ranbir Kapoor Shradha Kapoor tu jhuti mai makkar review bollywood news in marathi)
फर्स्ट हाफमध्ये सिनेमा हलका फुलका आहे तर सेकंड हाफमध्ये सिनेमा थोडासा कौटुंबिक होऊन जातो मात्र त्यातही अनेक ट्विस्ट आहेत. टिपिकल फॅमिली ड्रम न दाखवता हलकी फुलकी स्टोरी दाखवण्यात आली आहे.
डिंपल कपाडियाने आपल्या अभिनयाची उत्तम छाप सोडली आहे. बोनी कपूरचा (bony kapoor) वेगळा अंदाज या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शिवाय कार्तिक आर्यन (kartik aaryan) आणि नुसरत भरुचायांचाही अंदाज अनुभवायला मिळेल.
सिनेमातील संगीताविषयी बोलायचं झालंच तर सिनेमाचं संगीत उत्तम आहे. कथानकाला साजेशी संगीत सिनेमात वापरण्यात आलं आहे. बेदरडीया गाण्यात आरोयजितच्या आवाजाची जादू कायम दिसली. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्तम जमलीये, सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेला ऊत्तम न्याय दिला आहे. दिगदर्शक लव्ह रंजनने ही धुरा उत्तम सांभाळली आहे.
एकूणच सिनेमा प्रेक्षकांनाच मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. एकदा हा सिनेमा फॅमिलीसोबत, मित्र मैत्रिणीसोबत पाहायला हवा. (Tu Jhoothi Main Makkar Review)