मुंबई : 'अ‍ॅनिमल' हा मोस्ट वेटेड सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.  बॉबी आणि रणबीरशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज रणबीर कपूरला कोण ओळखत नाही. रणबीर कपूर हा एक असा अभिनेता आहे ज्याने अवघ्या काही वेळातच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. फॅमिली मॅनही असं या अभिनेत्याला म्हटलं जात. एक पती म्हणून जेवढी काळजी तो आलियाची घेतो तेवढीच काळजी तो एक बाबा म्हणून राहाची घेताना दिसतो. रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी सिनेमा एनिमलमुळे खूप चर्चेत आहे. सध्या अभिनेता एनिमलच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. सध्या रणबीर या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. रणबीर त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र अभिनेत्याने नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सिनेसृष्टीत सध्या खळबळ माजली आहे. 


Ranbir Kapoor आणि आलिया 6 नोव्हेंबर 2022 ला राहाचे पालक बनले.  त्याचवर्षी या दोघांनी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. राहा आता एक वर्षांची झाली आहे.नुकतंच एका इवेंटमध्ये अभिनेत्याने हे वक्तव्य केलं आहे. प्रमोशन दरम्यान रणबीरला त्याची मुलगी राहासोबत वेळ घालवता येत नाही. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा तो त्याच्या मुलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंण्ड करतो. नुकतंच रणबीरने या इवेंटमध्ये याविषयी बोलताना सांगितंल की, त्याला वाटतं की, त्याने एक्टिंग करणं बंद करावं आणि मुलीसोबत वेळ घालवावा. 


नुकताच रणबीर एका इवेंटसाठी हैद्राबादला पोहचला होता. प्रमोशनमध्ये बोलताना रणबीर म्हणला की, मला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला आता अभिनय बंद करायचा आहे. जरी आशी माझी ईच्छा असली तरी ते मी करु शकत नाी. कारण अभिनय ही माझी आवड आहे. आणि मला माझी आवडही जोपासायची आहे. राहा आणि अभिनय दोघंही माझ्या आयुष्यातील आनंद आहेत. जेव्हा देव तुमच्याकडून काही घेतो तेव्हा तो तुम्हाला काहीतरी देत असतो. राहा आमच्या आयुष्यात आली याबद्दल देवाचे मी खूप आभार मानतो.