मुंबई :  अभिनेता रणबीर कपूर सध्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि सुखद क्षणांचा आनंद घेत आहे. रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री  आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी आई होणार असल्याची गुडन्यूज  सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर अभिनेत्रीचा 'डार्लिंग्स' सिनेमा ओटीटीवर तुफान हिट झाला. पण रणबीरचा 'शमशेरा' मात्र मोठ्या पडद्यावर अपयशी ठरला. रणबीरची पत्नी आलिया यशाचं उच्च शिखर गाठत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या दोन एक्स-गर्लफ्रेंनने पण अनोखा विक्रम चरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री दीपिका पादुकोन, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट 2022 च्या एका सर्वेनुसार भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असल्याचं समोर आलं आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दीपिका पादुकोन, दुसऱ्या क्रमांकावर कतरिना कैफ, तर तिसऱ्या क्रमांकावर आलिया भट्ट आहे. 



दरम्यान आलियासोबत लग्न करण्याआधी रणबीरचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. त्यातील दोन म्हणजे दीपिका पादुकोन आणि कतरिना कैफ. पण दोघींसोबत त्याचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 


कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रणबीर आणि दीपिका पदुकोण यांनीही एकमेकांना डेट केलं. पण, त्यांच्या नात्याचा शेवट वाईट झाला आणि दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. त्यानंतर रणबीर आणि कतरिनाच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं देखील समोर आलं. 


आता रणबीर, दीपिका आणि कतरिना त्यांच्या जीवनात फार पुढे गेले आहेत. दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केलं आहे, तर दुसरीकडे कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं आहे.