मुंबई : अभिनेता रणबीर कपूर दीर्घ विश्रांतीनंतर 'शमशेरा' चित्रपटातून पडद्यावर पुनरागमन करत आहे. तब्बल चार वर्षांनंतर हा अभिनेता या चित्रपटात दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीर कोणतीही कसर सोडत नाहीये. दरम्यान, आता अभिनेत्याबाबत एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे चाहते काहीसे नाराज झाल्याचं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, रणबीर कपूरचे करोडो चाहते आता त्याला सतत चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा बाळगून आहेत पण अभिनेता पुन्हा ब्रेक घेण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे. पण दिलासा देणारी बाब म्हणजे यावेळी रणबीर जास्त ब्रेक घेत नसून तो फक्त आठवडाभराची सुट्टी घेणार आहे.


या सुट्ट्यांमध्ये रणबीर आणि आलिया हनीमूनला जाणार असल्याचं बोललं जात आहे. आलिया-रणबीरचं लग्न याच वर्षी एप्रिलमध्ये झालं होतं. लवकरच त्यांच्या घरी छोट्या पाऊलांचं आगमन होणार आहे. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये इतके व्यस्त आहेत की, ते अद्याप हनिमूनला जाऊ शकलेले नाहीत. मात्र, आता तो लवकरच ब्रेक घेण्याची तयारी करत आहे. नुकतंच रणबीरने याबाबत चर्चा केली आहे.


रणबीर कपूर शेवटचा 2018 साली आलेल्या 'संजू' चित्रपटात दिसला होता. जो संजय दत्तवर आधारित आहे. रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलै 2022 रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात रणबीरशिवाय संजय दत्त आणि वाणी कपूर देखील दिसणार आहेत. हा चित्रपट डाकूंवर आधारित आहे. 'शमशेरा' व्यतिरिक्त रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तो पत्नी आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करत आहे.