मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघंही त्यांच्या नात्याबद्दल खूप फ्री आहेत. याआधी रणबीर कपूरने कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण बरोबर अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. काही वर्षांपूर्वी रणबीरने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीरला मिळाले अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्स
एका रिपोर्टनुसार, 2017 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरला अनेकवेळा मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स बद्दल विचारण्यात आलं होतं. यावर त्याने सांगितलं की, तो काळ त्याच्यासाठी खूप चांगला होता. 2011 मध्ये, त्याला 'रॉकस्टार'साठी क्रिटिक्स चॉईस आणि अनेक लोकप्रिय श्रेणीसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यादरम्यान रणबीर कपूरने सांगितलं की, त्याची एक्स गर्लफ्रेंड हातात ट्रॉफी घेऊन ती तोडून टाकायची. हे ऐकून नक्कीच विचित्र वाटलं असेल, पण स्वत: रणबीरने याबाबत खुलासा केला आहे.


भांडण झाल्यावर एक्स गर्लफ्रेंड तोडायची ट्रॉफी
या मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने सांगितलं की, जेव्हाही त्याचं आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये भांडण व्हायचं तेव्हा प्रत्येकवेळी ती रागाच्या भरात त्याला मिळालेल्या ट्रॉफी तोडून टाकायची. मात्र यावेळी रणबीर कपूरने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं नाही.


कधी रिलीज होणार रणवीर-आलियाचा सिनेमा
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. अलीकडेच आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुट्टी एन्जॉयकरण्यासाठी  केनियाला गेली होती. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हे देखील या चित्रपटाचा महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.