मुंबई : आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या दोघी बॉलिवूडमधील खूर चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखल्या जातात. मात्र जशा आलिया आणि रणबीरच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या तेव्हा ही मैत्री थोडी दुरावली. आलियाची बेस्ट फ्रेंड आणि रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना मात्र या नात्यामुळे नाराज झाली. मात्र अद्याप या दोघींनी तशी काही चर्चा देखील केली नाही. आपल्या चांगल्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आता आपला बॉयफ्रेंड आहे अशी स्थिती फार विचित्र आहे. बॉलिवूडमधले हे स्टार देखील या परिस्थितीतून सुटले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा आज 35 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आलियाने आपल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने कतरिनासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत दोघी खूप मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोखाली कतरिनाने लिहिलं की, हॅप्पीएस्ट बर्थ डे कतरिना... 



रणबीर कपूरमुळे या दोघींमध्ये दुरावा आला अशी चर्चा असताना मात्र आलियाचा फोटो मात्र काही तरी वेगळंच सांगत आहे. आलिया आणि कतरिनामध्ये काही वाद नसल्याच या फोटोवरून कळत आहे. मात्र आपण कतरिनाचं स्टेटमेंट विसरू शकत नाही. तसेच कतरिनाच्या जवळच्या व्यक्तीने आलिया - रणबीरच्या रिलेशनशिपबद्दल खूप धक्कादायक वक्तव्य केलं होतं. कतरिनाला माहित आहे की, रणबीर - आलियाचं रिलेशनशिप कसं संपेल. हे सगळं तिने या अगोदर पाहिलं आहे. 


आलिया - कतरिनाने कधीच कोणताच सिनेमा एकत्र केलेला नाही. मात्र या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे. असं सांगितलं जातं की, या दोघींची ओळख एका जिममध्ये झाली होती. यानंतरच यांची ओळख वाढली आणि मैत्रित रुपांतर झालं. कायमच या दोघी एकमेकांच्या फोटो शेअर करताना दिसल्या