रणबीर कपूरने पुन्हा साधला कतरिना कैफवर निशाणा; त्याचं वक्तव्य ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ (Katrina Kaif and Ranbir Kapoor) यांची जोडी ही एकेकाळी खूप लोकप्रिय होती त्यातून आता दोघंही आपापल्या संसारात सुखी आहेत. मात्र अभिनेत्याच्या वक्तव्याने सगळेच हैराण झाले आहेत.
मुंबई : रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे, नुकताच रणबीर को-स्टार श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सोबत 'द कपिल शर्मा' शोमध्ये पोहोचला आहे. जिथे रणबीरने केलेलं एक वक्तव्य ऐकून सगळेच हैराण होत आहेत. यावेळी तो असं काहीतरी बोलून गेला आहे की, यानंतर कतरिना कैफ (Katrina Kaif)वर त्याने निशाणा साधल्याचं दिसत आहे.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ (Katrina Kaif and Ranbir Kapoor) यांची जोडी ही एकेकाळी खूप लोकप्रिय होती त्यातून आता दोघंही आपापल्या संसारात सुखी आहेत. त्यामुळे आता कतरिना आणि रणबीर हे कुठेतरी पडद्याआड (Ranbir Kapoor Movie) गेले होते. तरीही त्यांचीही आता बरीच चर्चा होताना दिसते.
मेकर्स नुकताच या शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ब्रेकअपवर बोलताना दिसत आहे. रणबीर म्हणाला की, लोकं ब्रेकअपला कसं हँण्डल करतात हे त्याने सांगितलं आहे. यामध्ये त्याने दो वेग-वेगळे प्रकार सांगितलं आहे की, स्त्रीया ब्रेकअप कसं हँण्डल करतात आणि पुरुष ब्रेकअप कसं हँण्डल करतात.
यावेळी बोलताना रणबीर कपूर म्हणला, 'जेव्हा एखाद्या मुलाचं ब्रेकअप होतं तेव्हा त्याचं पोट सुटू लागतं. त्याची दाढी वाढू लागते. पण, जेव्हा एखाद्या मुलीचं ब्रेकअप होतं तेव्हा तिचा चेहरा बिघडतो, तेव्हा त्या मुलीचे ओठ आणि आयब्रो पुन्हा का सेट झाले, की लगेच्या त्या दुसरीकडे पण सेट होतात.'' यावर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना असं वाटतं की, रणबीरने आपल्या वक्तव्यातून कतरिना कैफला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परस्थितीत रणबीरवर कमेंट करणारे युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
रणबीरच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, 'अब आएंगी फेमिनिस्ट दीदी लोग, अब उनका आरआर चलेगा.' तर दुसऱ्याने लिहिलं - 'द कपिल शर्मा शोमध्ये गेले नव्हते...' तिसऱ्या यूजरने लिहिले- 'कतरिनाचे चाहते नक्कीच आले असतील. रणबीर कपूरला महिलांचा मत्सर असल्याचा टॅग देत आहेत.' युजर्सनी रणबीरच्या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी फनी मीम्सच्या माध्यमातून रणबीरच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया चाहते देत आहेत..