मुंबई : गुरूवारी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चं एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना Dementia नावाचा आजार झाल्याचं म्हटलं होतं. असं म्हटलं होतं की, रणधीर यांची या आजाराची सुरूवातीची स्टेज आहे. या वक्तव्यानंतर रणधीर कपूर यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. 


रणबीरच्या वक्तव्याला रणधीर यांनी फेटाळलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांचं म्हणणं आहे की, त्यांची तब्बेत अगदी उत्तम असून ते ठणठणीत आहेत. त्यांना Dementia सारखा कोणताच आजार नाही. 


धक्कादायक म्हणजे रणधीर कपूर यांनी आपल्या भाच्याचच वक्तव्य फेटाळून लावलं  आहे. रणधीर पुढे म्हणाले की, मी अगदी उत्तम आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. एप्रिल २०२१ मध्ये मला कोरोनाची लागण झाली होती. 


लोकांनी जेव्हा त्यांना Dementia बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की, हे रणबीरने का सांगितलं? ही त्याची मर्जी. त्याला जे हवं ते तो बोलू शकतो. 


काय बोलला होता रणबीर कपूर?


रणबीर कपूर आपल्या वडिलांच्या अखेरच्या सिनेमाबद्दल भरभरून बोलला. पुढे तो म्हणाला की, माझे काका, ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर Dementia च्या सुरूवातीच्या काळातून गेले आहे. 


'शर्माजी की नमकीन' हा सिनेमा पाहिल्यानंतर ते माझ्याकडे आले. ते म्हणाले की, तुझ्या वडिलांना सांग तू उत्कृष्ठ आहे. कुठे आहे तो त्याला फोन करं.