मुंबई : 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ईशान खट्टरला 'धर्मा प्रॉडक्शन'मधून बाहेर केले आहे. त्यामुळे अभिनेता कमाल खानने दिग्दर्शक करण जोहरवर निशाना साधला आहे. करणने ईशानला 'धर्मा प्रॉडक्शन'मधून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप केआरकेने केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून केआरकेने या गोष्टीचा दावा केला आहे. त्यानंतर कंगणा रानौतची बहिण रंगोलीने करण आणि ईशानबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केआरके ट्विट करत म्हणाला की, 'माझ्या सुत्रांच्या माहितीनुसार, करणने ईशान खट्टरला 'धर्मा प्रॉडक्शन'मधून बाहेर केले आहे. ईशानने उद्धट भाषेचा वापर केला. यामुळे आता ईशान करणसोबत कोणताही चित्रपट करणार नाही.'


करण जोहरसाठी असे निर्णय घेणे फार सोपी गोष्ट आहे. असे वक्तव्य रंगोलीने केले आहे. आपल्या निर्भीड वक्तव्यामुळे मागील काही दिवसांमुळे रंगोली चांगलीच चर्चेत आहे. केआरकेच्या ट्विटवर रंगोलीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



ट्विटरच्या माध्यमातून रंगोलीने करणवर निशाना साधला आहे. 'करण ज्या नवीन कलाकारांना बॉलिवूडचा मार्ग मोकळा करून देतो, त्यांच्या कमाईतला मोठा वाटा आपल्याकडे ठेवतो. तसेच गरजेप्रमाणे तो अभिनेत्यांना अभिनेत्रींसह रिलेशनशिपमध्ये राहण्यास आग्रह धरतो.' 



 


अशा गोष्टींसाठी सगळेच होकार भरणार नाहीत. करिअर सोबतच माणसाकडे स्वाभिमान असणे गरजेचे आहे. स्वाभिमान नसेल तर चार पैसे कमवाल पण खऱ्या अर्थाने कोणतीच गोष्ट साध्य करू शकणार नाही. असे वक्तव्य रंगोलीने केले आहे.