मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. राणीने तिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्वात प्रभावशाली सिनेमा व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'हिचकी' चित्रपटासाठी तिला हा प्रभावशाली पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण-पूर्व आशियामध्ये आयोजित एका पुरस्कार कार्यक्रमात राणीला सर्वात प्रभावशाली सिनेमा व्यक्तिमत्त्व पुरस्काराने गौरविण्यात आले. 'हिचकी' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्राने केले होते. 



फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. शिवाय राणीच्या चित्रपटाने २५० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. सर्वात प्रभावशाली सिनेमा व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर राणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


'सर्वाधिक प्रभावशाली सिनेमा व्यक्तिमत्व माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. एक अभिनेत्री म्हणून मी फार खुश आहे की मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काही चित्रपट असे असतात जे चर्चेत येतात आणि ज्यामुळे समाजात बदल घडतात.'


'हिचकी' चित्रपटामध्ये राणी मुखर्जीने एका शिक्षकेची भूमिका साकारली आहे. 'टौरेट सिंड्रोम' या समस्येशी तिचा झगडा सुरू असतो. या समस्येवर मात करून तिला शिक्षक होण्याचं तिचं स्वप्न साकारायचं असतं. या चित्रपटात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नातेसंबंधावर आधारित कहाणी. या चित्रपटात राणीने साकारलेल्या भूमिकेचं नाव 'नैना' होतं.