Rani Mukerji Miscarriage : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा काल 21 मार्च रोजी वाढदिवस होता. सोशल मीडियावर तिला अनेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या निमित्तानं तिनं मीडियाशी चर्चा केली. इतकंच नाही तर तिनं अनेक गोष्टी या त्यांच्यासोबत शेअर केल्या. त्यापैकी एक म्हणजे, राणी मुखर्जीनं तिच्या दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगविषयी देखील सांगितलं आहे. तिनं सांगितलं की पहिल्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. तर मिसकॅरेज झाल्यानंतर तिला धक्का बसला आणि त्यानंतर ती ट्रॉमामध्ये गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणीनं यावेळी गलाट्टा इंडियाला मुलाखत दिली. यावेळी राणीनं सांगितलं की ती आजही आतून तरुण आहे आणि तिची इच्छा आहे की लोक जेव्हा पण तिला आठवतील तेव्हा त्यांनी तिला टीनाच्या रुपमध्ये आठवावं. त्याशिवाय तिनं सांगितलं की आई झाल्यानंतर एक स्त्री इतकी बदलते की तिचा नवरा देखील तिला पाहून आश्चर्य चकीत होतो. तिच्यात मां दुर्गा येते. ती आई होते. राणी दुसऱ्यांदा आई न होण्याच्या दु:खावर वक्तव्य केलं आहे. 


राणी म्हणाली, सगळ्यांना माहित आहे की हा माझ्यासाठी एक कठीण काळ होता. कोरोनाच्या काळात तिचा गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज झालं होतं. त्याच्याच आधी तिनं 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' हा चित्रपट केला होता. तर तिनं सांगितलं की तिचं वय हे तिच्या गर्भपातासाठी महत्त्वाचं कारण होतं, पण ती त्यातून बाहेर पडत होती. ती म्हणाली की 'हे ते वय नाही जेव्हा मी दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकेन आणि हे माझ्यासाठी दु:खद गोष्ट होती की मी माझ्या मुलीला भाऊ-बहीण देऊ शकली नाही.'


राणी पुढे म्हणाली की 'खरंच मला या गोष्टीचं फार वाईट वाटतं. मात्र, मग मला वाटलं की आमच्याकडे जे काही आहे आणि जे नाही, त्याच्यासाठी कायम आभारी असायला हवं. माझ्यासाठी आदिरा माझं सगळं काही आहे आणि मी फार आनंदी आहे की ती माझी आहे. कारण मी त्या आई-वडिलांना पाहते ज्यांना एक मुलं होणं देखील कठीण असतं त्यासाठी ते संघर्ष करत असतात. त्यामुळे मला वाटतं की माझ्याकडे जे काही आहे, त्यासाठी मी आभारी असायला हवं. ही एक म्हण आहे, जे आहे त्यात आनंदी रहा.' 


हेही वाचा : श्रद्धा कपूरला आईनं लगावली कानशिलात ! फोटो शेअर करत अभिनेत्रीचा खुलासा


राणी आणि तिच्या कुटुंबा विषयी बोलायचे झाले तर आदित्य चोप्रासोबत तिनं 9 डिसेंबर 2014 मध्ये लग्न केलं. तर 9 डिसेंबर 2015 रोजी राणीनं आदिराला जन्म दिला. तेव्हा पासून राणी आणि आदित्यनं तिचा चेहरा पापाराझी आणि सोशल मीडियापासून लांब ठेवला आहे. राणीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती एक लेखिका म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. राणी एक पुस्तक लिहित आहे. या पुस्तकात ती आदित्य चोप्रासोबतच्या तिच्या नात्यावर सविस्तरपणे सांगणार आहे.