मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्यानंतर श्रीदेवी या सुपरस्टार ठरल्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेक बॉलिवूड स्टार्सला देखील धक्का बसला आहे. देशभरात त्यांचं अनेक फॅन्स आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील त्यांचे चहाते आहेत. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने यंदा यामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राणीने अशा प्रकारे श्रीदेवी यांना राणीने श्रद्धांजली वाहिली आहे. 
 
राणीने दु:ख जाहीर करत श्रीदेवी यांच्याशी जोडलेल्या आठवणी शेअर केल्या. पत्रकारांच्या प्रश्नानंतर श्रीदेवीने म्हटलं की, ती या घटनेनंतर खूप दु:खी आहे. यामुळे ती यंदा आपला ४० वा वाढदिवस साजरा करणार नाही.


रानीने म्हटलं की, श्रीदेवी यांच्यासोबत त्यांचं खूप खोल नातं होतं. त्या आवडत्या अभिनेत्रीच नाही तर एक आवडत्या व्यक्तीमत्व देखील होत्या. त्यांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालं आहे.


श्रीदेवी यांच्यासोबत शेवटची भेट कधी झाली याबाबत सांगत असतांना राणीने म्हटलं की, हिचकी सिनेमा पाहण्यासाठी त्या खूप इच्छूक होत्या. जण सिनेमा पूर्णपणे तयार नव्हता. तेव्हा त्यांना राणीने म्हटलं की, दुबईवरुन आल्यानंतर त्यांना ती नक्की सिनेमा दाखवेल. राणीला या गोष्टीची खूप खंत आहे की श्रीदेवींना ती तो सिनेमा दाखवू शकली नाही.