मुंबई : अभिनेत्री रानी मुखर्जी हिचकी सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने डान्स इंडिया डान्स या रियालिटी शो मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या चित्रपटात ती एका शालेय शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. यावेळीरानीने ब्लॅक रंगाचा शराऱ्यावर पिंक दुपट्टा घेतला होता. रानीची ही स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिचकी चित्रपटात रानीला सारखी उचकी येण्याचा त्रास असल्याने तिला नोकरी मिळत नसते. मग पुढे काय  होते, हे चित्रपटात पाहायला मिळेल.


२०१४ मध्ये आलेल्या मर्दानी या चित्रपटात रानी शेवटची दिसली होती. त्यानंतर तिच्या मुलीच्या अदिराच्या जन्मामुळे ती ब्रेकवर होती.


रानी मुखर्जीचा हचकी हा चित्रपट सुरूवातीला २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट २३ मार्चला प्रदर्शित होईल.