मुंबई : पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थनकाबाहेर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला चांगलीच कलाटनी मिळाली आहे. 'एक प्यार का नगमा है' गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख दिली. इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू आता प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामाविष्ट झाल्या आहेत. पण गेल्या कही दिवसापासून त्या कोठे आहेत? काय करतात? याबद्दल काही माहिती नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताही अनेकदा सोशल मीडियावर रानू मंडलचे व्हिडिओ समोर येत असतात, ज्यांना पाहून कधी आराम मिळतो तर कधी काही लोक हसतात. रानू मंडलचा नुकताच एक व्हिडिओ असाच काहीसा समोर आला आहे. जो पाहून रानू मंडल प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. 


रानू बाईकवर बसलेली दिसली
पुढे बसलेला मुलगा पांढऱ्या टी-शर्टमध्ये हिरव्या पट्ट्यांचा शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.रानू आणि तिच्यासोबत बसलेला मुलगा काहीतरी गाताना दिसत आहे. मात्र, रानूला असं पाहून काही लोक सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवत आहेत आणि तिच्यावर विचित्र कमेंटही करत आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रानू मंडल एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे. रानू विस्कटलेल्या केसांमध्ये कोणत्याही मेकअपशिवाय निळ्या रंगाच्या वनपिस  परिधान केलेली दिसतेय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रानू मंडलच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर एका युजरने कमेंट करत लिहिलं की, 'वरच्याला घाबरा, गरुड पुराणात वेगळीच शिक्षा आहे'.  तर अजून एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'त्याची मानसिक स्थिती ठीक वाटत नाही'. तर दुसरीकडे काही युजर्स बाइकवर बसलेल्या मुलाला रानूचा बॉयफ्रेंड म्हणत तिची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अखेर रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटला'.  इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर विचित्र कमेंट येत आहेत. आणि रानू मंडलला ट्रोलही केलं जात आहे.