हिमेश रेशमिया आणि रानू मंडल यांच्या आवाजातील `हे` गाणं व्हायरल
रानू मंडल आज इंटरनेट स्टार बनल्या आहेत.
मुंबई : रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज इंटरनेट स्टार बनल्या आहेत. त्यांच्या सुरेल आवाजातील एका व्हायरल व्हिडिओने रानू प्रसिद्धीझोतात आल्या. काही दिवसांपूर्वी संगीत दिग्दर्शक आणि गायक हिेमेश रेशमियाने रानू यांना त्याच्या आगामी चित्रपटासाठी गाणं गाण्याची संधी दिली.
या गाण्याच्या रेकॉर्डिंगची एक झलक हिेमेश रेशमियाने शेयर केली होती. या झलकनंतर आता हे संपूर्ण गाणं समोर आलं आहे. रानू यांनी आगामी 'हॅप्पी होर्डिं अॅन्ड हीर' चित्रपटातील 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गायलं आहे. या चित्रपटात हिमेश रेशमिया डबल रोलमध्ये दिसतोय. एका सीनमध्ये तो पगडी बांधलेल्या सरदाराच्या भूमिकेतही दिसतोय.