मुंबई : साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा' या चित्रपटातील 'श्रीवल्ली' हे गाणं खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्यावर सामान्य लोकांसोबतच सेलेब्स देखील जोरदार रील बनवत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड गाजले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात आता पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर रानू मंडलचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे.  रानू मंडल यांच्या हातात काठी आहे. तिने अल्लूप्रमाणे लुंगी नेसली आहे. रानू मंडलचा हा डान्स व्हिडिओ पाहून लोक हसून वेडे झाले आहेत.


चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत की, हा व्हिडिओ अल्लू अर्जुनला दाखवला पाहिजे.


रेल्वे स्टेशनवर भीक मागून आयुष्य जगणाऱ्या रानू मंडलने अचानक सोशल मीडियावर खळबळ माजली. त्याच्या आवाजाची सर्वांनाच खात्री पटली.



रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा हे गाणे गाऊन संपूर्ण देशाची मने जिंकली आणि लोकांनी तिला रातोरात स्टार बनवले.