मुंबई : अगदी अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या रानू मंडलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रानू मंडल गाणं गात नाही आहे तर तिचा वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रानू मंडल चक्क ट्रोल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत रानू मंडलने तिच्या चाहत्यांना असं काही की ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. ज्या चाहत्यांनी दिला डोक्यावर उचलून धरलं त्याच चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. रानू मंडल देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे वागतेय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 



एरवी अगदी सरळ, शांत दिसणारी रानू मंडल या व्हिडिओत भडकलेली दिसत आहे. सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहतीवर रानू मंडल भडकली आहे. रानू मंडलने फिमेल फॅनला अशी वागणूक दिल्यामुळे चाहते भडकले आहेत. 


कोलकाता येथील रानाघाटवरील रेल्वे स्टेशनवर गायलेल्या 'एक प्यार का नगमा है' या गाण्यामुळे रानू मंडल एका रात्रीत लोकप्रिय झाली. त्यानंतर लगेच तिला हिमेश रेशमियाने साईन करून घेतलं आणि तीन गाणी गाऊन घेतली. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. 



एवढंच नव्हे तर सलमान खान रानू मंडलला घर गिफ्ट करणार असल्याची चर्चा देखील रंगली. तसेच रानू मंडलच्या जीवनावर आधारित बायोपिक येत असल्याची देखील चर्चा रंगली. पण एका रात्रीत मिळालेलं हे यश रानू मंडलच्या डोक्यात गेलं आहे का? असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून ही गोष्ट अधोरेखित होत आहे.