क्रिकेट-कथा-कलाकार सगळंच Best, तरीही बॉक्स ऑफिसवर `83` ची विकेट
83 सिनेमाची चार दिवसातील कमाई
मुंबई : 1983 मध्ये भारताच्या दिग्गज खेळाडूंनी विश्वकप जिंकून इतिहास रचला. हा इतिहास सुंदर कथेच्या रुपात दिग्दर्शक कबीर खानने रुपेरी पडद्यावर मांडला. कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंहचं अधिक कौतुक झालं. चाहत्यांनी आणि समिक्षकांनी देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला. 83 सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालेल अशी आशा होती. मात्र तसं झालं नाही.
ओमायक्रॉनचा धोका, हॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांचं एकत्र रिलीज होणं. सगळंच 83 सिनेमाकरता भारी पडलं. या 5 कारणांमुळे 83 सिनेमा फार चांगला नाही.
सर्वप्रथम 83 च्या पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहू. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 83 च्या कमाईनुसार चित्रपटाची कमाई सादर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी 12.64 कोटी रुपयांनी सिनेमाने ओपनिंग केली. शनिवारी ही कमाई 16.95 कोटी रुपये आणि रविवारी 17.41 कोटी रुपये होती.
मात्र सोमवारी हा आकडा खाली आला. 10 कोटी रुपयांमध्ये हा आकडा दिसला. चौथ्या दिवशी तर ही कमाई अगदी 7.29 कोटी रुपयांवर आली. चार दिवसांत या सिनेमाने 54.29 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सिनेमातील गाणी
सिनेमा न चालण्यामागे पहिलं कारण सिनेमातील गाणी. सिनेमात अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी उत्कटता वाढवली आहे. पण त्यातील एकही गाणे प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणार नाही.
ओमायक्रॉनचा कहर
दुसरा ओमिक्रॉन आहे जो खूप महत्वाचा आहे. सध्या कोरोनाची भीती लोकांच्या मनात नव्हती की ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. लोक थिएटरला भेट देण्याचे हे देखील एक कारण आहे.
हॉलिवूड, साऊथ सिनेमाच चित्रीकरण
सिनेमा न चालण्यामागचं तिसरं कारण म्हणजे हॉलिवूड आणि साऊथचे चित्रपट प्रदर्शित. हॉलिवूड चित्रपट स्पायडर-मॅन नो वे होम आणि साऊथ चित्रपट पुष्पा 83 च्या एक आठवडा आधी प्रदर्शित झाला. यामुळे हा सिनेमा चालला नाही.
कलाकारांच्या मेकअपमध्ये तो दम नाही
रणवीर सिंह सोडला तर इतर कोणत्याही कलाकाराच्या मेकअपमध्ये तो दम नाही. रणवीर सिंह कपिल देव यांच्यासारखा दिसतो मात्र इतर कलाकारांच्या मेकअपवर मेहनत नाही घेतलेली.
दीपिकाला ठरलं कारणीभूत
दीपिका पदुकोणने या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मात्र दीपिकाचं या सिनेमात फार कौतुक झालं नाही. दीपिकाचा अपेक्षित अभिनय प्रेक्षकांना पाहता आलं नाही.