मुंबई : गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विराट - अनुष्काने लग्न केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बॉलिवूडमध्ये आणखी एक कपल लग्नासाठी सज्ज झालं आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे दोघं देखील विरूष्काच्या पावलावर पाऊल ठेवत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. 


हल्लीच प्रदर्शित झालेला पद्मावत या सिनेमांत दोघांचा अभिनय साऱ्यांनाच आवडला. तसेच इंडस्ट्रीमध्ये आता दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप या दोघांपैकी एकानेही याबाबत काहीच सांगितलेलं नाही. 



इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर यावर्षी जून किंवा जुलै महिन्यात लग्न करणार आहे. या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाची खरेदी देखील केली आहे. दीपिका आणि रणवीर देखील डेस्टिनेश वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. तसेच दोघांना बीच भरपूर आवडत असल्यामुळे बीच साईडलाच हे लग्न होईल असं सांगितलं जात आहे. 


या लग्नानंतर दोन रिसेप्शन होणार असल्याची माहिती देखील इंडिया डॉट कॉमने दिली आहे. एक रिसेप्शन मुंबईत होणार असून दुसरं बंगलुरूमध्ये होणार आहे. यावेळी दीपिकाचे जवळचे नातेवाईक आणि कुटुंबिय उपस्थित राहतील. तर मुंबईला अनेक बॉलिवूड कलाकार आणि दीपिका - रणवीरचे फ्रेंड्स उपस्थित राहतील.