अखेर ठरलचं ! या दिवशी वाजणार दीपिका-रणवीरच्या लग्नाचा बॅण्डबाजा
आता खुद्द दीपिकानेच आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केलीयं.
मुंबई : ज्या क्षणाची सर्वजण इतके दिवस आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण अखेर आलाचं. रणवीर सिंह आणि दीपिकाने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. याआधी दोघांच्या लग्नाच्या तारखेसंबंधी अनेक अंदाज बांधले जात होते. आता खुद्द दीपिकानेच आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केलीयं.
दीपिकाने ट्विटरवर फॅन्सना ही आनंदाची बातमी दिलीयं.
'आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की आमच्या परिवाराच्या आशीर्वादाने आमचं लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला ठरलंय. इतक्या वर्षात तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि आदर दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या सुरू होणाऱ्या प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या या नात्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. खूप सारं प्रेम- दीपिका आणि रणवीर.' असं दीपिकाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
दीपिका घेणार ही खबरदारी
दीपिका आपल्या लग्नसोहळ्याला खास करू इच्छिते. तसेच तिला आपलं लग्न अगदी खाजगी ठेवायचं आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीरने असा निर्णय घेतला आहे की, लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एख खास विनंती केली आहे. लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाने मोबाइल आणि कॅमेरा आणू नये अशी खास विनंती केली आहे.
आपल्याला माहितच आहे अनुष्का शर्मा - विराट कोहलीच्या लग्नाचे फोटो अगदी लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रत्येक कलाकाराला आपलं लग्न हे अतिशय खाजगी ठेवायचं असतं. पण फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ते लग्न खाजगी राहत नाही. त्यामुळे दीपिका - रणवीर यांनी हा निर्णय घेतला आहे.
दीपिकाची अजिबात इच्छा नाही की, तिच्या लग्नातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत. यासाठी त्यांनी खास सुरक्षेचा देखील वापर केला आहे.
दीपिका आणि रणवीर यांना स्वतःला त्यांच्या लग्नातले फोटो शेअर करायचे आहेत. अनुष्काप्रमाणेच सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
याबाबत सोनमने आपण याबाबत नाराज असल्याचं देखील म्हटलं होतं.
इटलीच्या लेक कोमो येथे हे लग्न ठरवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी असणार आहेत.