...म्हणून रणवीर सिंह होतोय ट्रोल
नेटकऱ्यांकडून रणवीर ट्रोल, मुंबई पोलिसांबद्दलही नाराजी
मुंबई : बॉलिवूड 'सिम्बा' रणवीर सिंह कधी त्याच्या कपड्यांच्या भन्नाट स्टाईलमुळे... कधी त्याच्या जबरदस्त एनर्जीमुळे... तर कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. परंतु आता रणवीरला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. मुंबई पोलिसांच्या 'उमंग २०१९' या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी रणवीरला उचलून घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीरला ट्रोल केलं जातंय. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांबद्दलही नाराजी व्यक्त केली जात आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर 'वायरल भयाणी'ने रणवीर आणि मुंबई पोलिसांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 'उमंग २०१९' या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेल्या पोलिसांसह रणवीर मस्ती करताना दिसत आहे. यावेळी पोलिसांनी रणवीरला उचलून घेतलं. या फोटोवर सोशल मीडियावरून अनेकांनी टीका केली आहे. एका यूजरने 'तुम्ही 'रिअल हिरो' आणि रणवीर 'रिल हिरो' आहे. तुम्ही रणवीरला उचलून घ्यायला नको हवं होतं. तुम्ही असं कसं करू शकता?' असा सवाल करत रणवीर आणि पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
रणवीर सिंह आणि सारा अली खान स्टारर 'सिम्बा' चित्रपट २८ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. 'सिम्बा'ला प्रेक्षकांची चागंलीच पसंती मिळाली असून 'सिंबा' २०१८ सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. बॉक्सऑफिसवर 'सिम्बा'ने जगभरात ४०० कोटीपर्यंत गल्ला जमवला असून रणवीरच्या खास भूमिकेलाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. चित्रपटाच्या यशानं आनंदित झालेल्या रोहित शेट्टीने मुंबईत झालेल्या 'उमंग २०१९' या कार्यक्रमात पोलिसांना ५१ लाख रूपयांचा मदतनिधी दिला आहे.