Ranveer Singh on Kalki 2898 AD: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या मल्टी स्टारर चित्रपटाने दणक्यात कामगिरी केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिकाबरोबरच कमल हसन यांचाही समावेश आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या आताच जागतिक स्तरावर 1 हजार कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. असं असतानाच आता दीपिकाने या चित्रपटाबद्दल तिच्या पतीने म्हणजेच अभिनेता रणवीर सिंहने दिलेल्या रिव्ह्यूचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


रणवीर नेमकं काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह पत्नीचा हा नवा चित्रपट पाहून थक्क झाल्याचं दिसत आहे. नाग अश्वीन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट पाहून रणवीरच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित करणारे हावभाव दिसून येत आहे. "हा असा चित्रपट पाहणे माझ्यासाठी खरोखरच अवघड आहे. जिथे तिचे (दीपिकाचे) पात्र गर्भवती आहे आणि ती खरोखरच गर्भवती आहे. असा चित्रपट पाहून तुमचं, अरे हे सारं काय होत आहे? असं होऊन जातं," असं रणवीर म्हणता दिसत आहे. रणवीर चित्रपट पाहिल्यानंतर स्वत:चं डोकं धरुन हे सारं म्हणता दिसत आहे.


प्रेक्षकांना चित्रपट कसा वाटला?


याच व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला हे सुद्धा ते सांगताना दिसत आहे. दीपिकाने या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर वेगवेगळ्या चित्रपटगृहांना भेट दिल्याचे छोटे छोटे व्हिडीओही आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहून दीपिकाने 'मला हा प्रतिसाद ऐकून फार भरुन आलं आहे,' असं म्हटलं आहे.



शेवटच्या सीनच्या शुटींगला स्वत: रणवीर होता सेटवर


'कल्की 2898 एडी' चित्रपटातील शेवटचा सीन दीपिका खरोखरच गरोदर असल्याने मुंबईत शूट करण्यात आला. या सीनमध्ये दीपिकाला खलनायक केस धरुन जमीनीवर ढकलतो असं दाखवण्यात आलं आहे. या सीनच्या शुटींगदरम्यान रणवीर स्वत: सेटवर उपस्थित होता. दीपिका काही हवं नको ते तो स्वत: पाहत होता. हा सीन शूट करणारे अभिनेते शाश्वत यांनी रणवीरला चिंता करुन नकोस झटापटीच्या दुष्यांच्या चित्रिकरणासाठी बॉडी डबल वापरणार आहेत, असं सांगितलं होतं. त्यावर रणवीरने हसतच शाश्वत यांना, "मला माहितीये दादा," असं उत्तर दिल्याचं खुद्द शाश्वत यांनी सांगितलं. सध्या तिकीटबारीवर इतर कोणताही मोठा चित्रपट समोर नसल्याने 'कल्की 2898 एडी' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.