मुंबई : रणवीर सिंग त्याच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी ओळखला जातो. अलीकडेच हा अभिनेता प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये दिसला होता. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन सोबत तिची मुलगी आराध्या देखील अभिषेकच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आली होती. आता रणवीर सिंग आणि ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे रणवीर सिंगलाही ट्रोल केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय आणि रणवीर सिंगच्या या क्यूट व्हिडिओवर त्यांचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत तर काहींना रणवीर सिंगची ही स्टाईल आवडलेली नाहीये. या व्हिडिओमध्ये रणवीर ऐश्वर्या रायला किस करताना दिसत आहे. तिची मुलगी आराध्याही ऐश्वर्याच्या बाजूला बसल्याचं दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये ऐश्वर्याही रणवीर सिंगचे गाल ओढताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.


व्हिडिओमध्ये क्यूट बाँडिंग दिसत आहे
या व्हिडिओत रणवीर सिंग आणि ऐश्वर्या राय यांची क्यूट बाँडिंग पाहायला मिळत आहे. तिची मुलगी आराध्याही ऐश्वर्याजवळ बसलेली दिसत आहे. या व्हिडिओतील रणवीर सिंगच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर हिरव्या रंगाच्या फुलांच्या शर्टमध्ये दिसत आहे, ज्यावर त्याने टोपी घातली आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या प्रेमाने गाल ओढताना दिसत आहे. या व्हिडिओवरून काही लोक रणवीर सिंगला ट्रोलही करत आहेत.


जिथे जिथे  रणवीर सिंग  स्पॉट  तिथे तिथे तो पूर्ण उत्साहात दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसतो. प्रो कबड्डी लीगनंतर, अभिनेता फिफा विश्वचषक पाहण्यासाठी निघून गेला. त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही यावेळी दिसली होती. फिफा वर्ल्ड कपमध्येही रणवीर सिंगची वेगळी स्टाइल पाहायला मिळाली. रणवीर आणि दीपिकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असतात. ज्यामध्ये रणवीर सिंगची मस्ती भरलेली अनोखी स्टाइल पाहायला मिळते. दिपवीर हे बॉलिवूडचं फेवरेट कपलपैकी एक आहे. 


ऐश्वर्याने देखील तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आराध्याच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या अभिषेक आणि आराध्या ट्रॉफीसोबत दिसत आहेत. याशिवाय ऐश्वर्यानं सेल्फी देखील शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी सीझन 9 चे चॅम्पियन आहेत.