Ranveer Singh Kissed Aishwarya Rai Bachchan In Front Of Her Husband Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा त्याच्या हटके फॅशनसाठी ओळखला जातो. सध्या रणवीर त्याचा आगामी चित्रपट सर्कसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सगळ्यात तो प्रो कब्बडी लीगच्या फायनलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिची लेक आराध्यासोबत (Aaradhya) पती अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) टीम जयपूर पिंक पॅँथरला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. यावर रणवीर आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालं आहे. या व्हिडीओत रणवीरनं ऐश्वर्याला किस केल्यानंतर तिनं कशा प्रकारे रिअॅक्ट केलं हे दाखवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अभिषेकसमोर ऐश्वर्याच्या हातावर रणवीरनं किस केल्यानंतर ती कशा प्रकारे रिअॅक्ट करते हे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या रणवीरचे गाल ओढते आणि त्याच्याशी गप्पा मारते. या व्हिडीओत नव्या नवेली नंदा देखील दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओत रणवीरनं हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचे कपडे परिधान केले आहेत. शिवाय नेहमी प्रमाणे लूक हटके करण्यासाठी रणवीरनं टोपी देखील घातली आहे. तर ऐश्वर्या, आराध्या, नव्या नवेली नंदा आणि अभिषेकनं जयपूर पिंक पॅन्थरची जर्सी परिधान केली आहे. 



आत्तापर्यंत प्रो कबड्डी लीगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत अभिषेक हा ऐश्वर्या आणि आराध्यासोबत त्याची टीम जयपूर पिंक पॅन्थरची जर्सी परिधान केल्याचे दिसत आहे. अभिषेकची कबड्डी टीम 'जयपुर पिंक पॅंथर' (Jaipur Pink Panther) यांनी प्रो कबड्डी लीगच्या 9 व्या सीजनचा खिताब जिंकला आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  


हेही वाचा : कलाविश्वात शोककळा जेष्ठ अभिनेत्याचे निधन


संघाच्या विजयाच्या आनंदात अभिषेक स्वत:ला सावरू शकला नाही आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांना जवळ घेत त्यानं मीठी मारली. ऐश्वर्या आणि अभिषेकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या तिघांना झालेला आनंद पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्यांनी आनंदात डान्स देखील केला.


ऐश्वर्याने देखील तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आराध्याच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या अभिषेक आणि आराध्या ट्रॉफीसोबत दिसत आहेत. याशिवाय ऐश्वर्यानं सेल्फी देखील शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी सीझन 9 चे चॅम्पियन आहेत.