रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?
Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो!
Ranveer Singh Kisses Deepika Padukone: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंगच्या घटस्फोटाची. ते दोघं वेगळे राहत आहेत. कधी एकमेकांसोबतचे फोटोही ते दोघं सोशल मीडियावर शेअर करत नाहीत, अशाप्रकारे त्यांच्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु आता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण यांची चांगलीच चर्चा रंगली होती. वाढदिवसाच्यावेळीही रणवीरनं आपला आणि दीपिका पादूकोणचा एक गोड फोटो शेअर केला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र दीपिकाची एकही पोस्ट नव्हती. त्यामुळे त्यांचे चाहते संभ्रमात होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रणवीरनं आपला आणि दीपिकाचा फोटो टाकल्यानं मात्र चर्चांना चांगलेच वळण मिळाले होते. आता त्या दोघांचा असाच एक व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यावर चित्र स्पष्ट होतं आहे की त्या दोघांमध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे.
सध्या रणवीर सिंग हा आपला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रमोट करण्यात चांगलाच बिझी आहे. तेव्हा यावेळी त्यानं आणि या चित्रपटाची को-स्टार आलिया भट्ट यांनी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या शोला हजेरी लावली होती. यावेळी मनीष मल्होत्राच्या पारंपारिक आणि सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र, भरगच्च एमब्रोयडरी असलेल्या आऊटफिटमध्ये दोघंही प्रचंड आकर्षक आणि सुंदर वाटत होते. यावेळी प्रेक्षकांमध्ये दीपिकाही बसली होती. तेव्हा तिला पाहताच रॅम्प वॉक करत पापाराझींसमोर आलेला रणवीर वळला आणि आपल्या पत्नीला म्हणजेच दीपिकाला जाऊन तो प्रेम तिच्या कपाळावर आणि गालावर कीस करतो. सध्या हा व्हीडिओ प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे या व्हीडिओ चाहते नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा - Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इन्टाग्राम पापाराझी पेज मानव मंगलानी यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर सिंग सुंदर पांढऱ्या आणि स्कीन कलरच्या शेरवानीमध्ये रॅम्पवॉक करायला सुरूवात करतो आणि मग पुढे येताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दीपिका काही क्षण प्रेमानं पाहतो आणि मग तिच्या जवळ जातो आणि बसलेल्या दीपिकाला वाकून तिच्या गालावर कीस करतो आणि मग दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात.
दीपिकासोबत तिच्या बाजूला बसलेल्या त्याच्या आईलाही तो कीस करतो आणि त्यांच्या पायाही पडतो. बाजूला करण जोहर बसलेला असतो त्यालाही तो भेटतो परंतु बाजूला बसलेल्या काजोलला मात्र तो इन्गोर करतो असं नेटकरी म्हणतात.