Ranveer Singh Reel: रणवीर सिंग आणि आलिया भट्ट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे तेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते दोघंही व्यस्त आहेत. 2019 साली आलेल्या 'गल्ली बॉय' या चित्रपटानंतर रणवीर आणि आलियाची जोडी ही आता या चित्रपटातून दुसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्यामुळे या चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकतंच रणवीर सिंगनं एक रिल शेअर केलं आहे. त्याचे हे रील सध्या सगळीकडेच व्हायरल झालं आहे. त्यामुळे या रीलखाली नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्सही येताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल या रीलमध्ये असं काय आहे की हे रील एवढं व्हायरल झालं आहे. परंतु या रीलच्या कॅप्शननंच सर्वांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉकी और रानी की प्रेम कहानीचे पोस्टर करण जोहरच्या वाढदिवसाला प्रदर्शित झाले होते. त्यानंतर या चित्रपटाची एकच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा पहिला टीझरही प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. आता या चित्रपटातील एक गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे रॉमेण्टिक गाणंही सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. करण जोहरच्या या चित्रपटातून आपल्याला भव्यदिव्य सेट आणि इमोशन्स, ड्रामा दिसणार आहे. 


हेही वाचा - 'बाईपण भारी देवा' पाहून आदेश बांदेकर भावूक; केदार शिंदेंनी लिहिली खास पोस्ट


या चित्रपटातील 'तुम क्या मिले' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यावेळी यावरच रणवीर सिंगनं एक रील शेअर केलं आहे. परंतु तो रणवीर सिंग आहे तो कसला शांत बसतोय. त्याच्या या नव्या रीलनं चाहत्यांना पुन्हा त्याच्या एनर्जीचा अंदाज आला आहे. यावेळी त्यानं सिंपल शर्ट परिधान केला आहे. त्यात तो एका बीचवर दिसतो आहे. त्यानंतर त्याचे ब्रकराँऊड बदलताना दिसत आहेत. त्यातून त्यानं या रीलवर भरपूर एडिटिंग केलं आहे. त्यामुळे त्यानं या रीलच्या खाली कॅप्शनमध्ये गमतीत लिहिलं आहे की, ''आलिया ऐवढे बजेट माझ्याकडे नाही की मी रील करेन.'' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलिया महागड्या ठिकाणी रील करते. तर रणवीरनं एडिट करून बॅकराऊंड बनवलं आहे. त्यामुळे तो असं गमतीत म्हणताना दिसतो आहे. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी रणवीरला ट्रोलही केलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, ''आदिपुरूष व्हीएफएक्स टीम काहीतरी शिका रणवीरकडून''. तर आलियानं कमेंट करत म्हटलंय की, ''लेजेंड''