Ranveer Singh Grandfather's Video : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी आणि क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या संबंधीत अनेक व्हिडीओ रणवीर सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरनं त्याची पत्नी दीपिकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत दीपिका या चित्रपटातील झुमका या गाण्याची हूक स्टेप करताना दिसते. आता रणवीरनं त्याच्या आजोबांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ते देखील या गाण्यावर हूक स्टेप करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगनं त्याच्या आजोबांचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रणवीर सिंग त्याच्या आजोबांसोबत असल्याचे दिसत आहे. रणवीरच्या आजोबांनी देखील त्याच्याच प्रमाणे पोझ दिली आहे. तर पुढे एक व्हिडीओ असून झुमकाच्या ओरिजनल गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हॉट झुमका? असं लिहिलेलं निळ्या रंगाचं स्वेट शर्ट परिधान केलं आहे. तर त्याच्या आजोबांनी काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं असून टीम रॉकी असं लिहिलं आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत रणवीरनं कॅप्शन दिलं आहे की 'Nana is peak Rocky-ism! 93 and Rock(y)ing.' तर रणवीरनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यानं आजोबांच्या 93 व्या वाढदिवसाच्या निमित्तन शेअर केली होती. 



रणवीरच्या या पोस्टवर कमेंट करत चित्रपट दिग्दर्शक करण जोहर नेटकरी म्हणाला, दोघेही हॅन्डसम दिसत आहात. एक नेटकरी म्हणाला, तुझ्या रक्तातच आहे ते. अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केल्या आहेत. क्रिती सेनन म्हणाली, सुपर कूल. झरीन खान म्हणाली किती कूल ना. कुब्रा सैथ म्हणाली, हाहाहा... टिक्की छोडो टकीला लाओ. अशा अनेक भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी केला आहे. 


हेही वाचा : 'ही' चिमुरडी आज जगभर फिरतेय, सौंदर्याच्या परिभाषा बदलतेय...; हिला ओळखलं का?


दरम्यान, रणवीर सिंगच्या या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तर त्याशिवाय त्यांच्यासोबत दिग्गज कलाकार धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. खरंतर या चित्रपटाचं बजेट हे 160 कोटी होतं. तर त्या चित्रपटानं पाच दिवसात 60.17 कोटींची कमाई केली आहे.