'ही' चिमुरडी आज जगभर फिरतेय, सौंदर्याच्या परिभाषा बदलतेय...; हिला ओळखलं का?

ही मराठी अभिनेत्री आज जगभरात फिरते. आता तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या वयाच्या 10 व्या वर्षात तिला कोणत्या गोष्टींची कल्पना नव्हती याविषयी सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्या बेबी गर्लला आता खूप गर्व होत असेल हे देखील म्हटलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 2, 2023, 01:02 PM IST
'ही' चिमुरडी आज जगभर फिरतेय, सौंदर्याच्या परिभाषा बदलतेय...; हिला ओळखलं का? title=
(Photo Credit : Mitali Mayekar Insatgram)

Mitali Mayekar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. ते दोघेही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय असतात. तर त्यांच्या पोस्ट या चांगल्याच चर्चेत राहतात. नुकतीच मितालीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी तिला कोणत्या गोष्टीची कल्पना नव्हती याविषयी सांगितले आहे. 

मितालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती 10 वर्षांची असतानाचा फोटो दिसत आहे. त्यावर मितालीनं एक कॅप्शन दिलं आहे की या 10 वर्षांच्या मुलीला काहीही कल्पना नव्हती. त्यानंतर मितालीनं तिचे काही फिरतानाचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देत मिताली म्हणाली की 'आज ही स्त्री म्हणून ती जशी आहे, ते पाहूया या बेबी गर्लला नक्कीच आनंद आणि गर्व होत असेल हे मला माहितीये.' मितालीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मितालीच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, सगळ्यांचं लक्ष हे तिचा पती सिद्धार्थच्या कमेंटनं वेधलं आहे. सिद्धार्थ कमेंट करत म्हणाला, 'बरं झालं शाळेत असताना नाही भेटलो आपण.' तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'श्रेया पिळगावकर सारखी दिसतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मिताली दरेकरसारखी दिसायची लहाणपणी.' तिसरा नेटकरी म्हणाला '22 वर्षांचा असूनही मला माहित नाही की मला काय करायचं आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पहिलेच चांगली होतीस तू.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू लहाणपणा पासूनचं सुंदर आहेस.' 

हेही वाचा : नितीन देसाईनीं जिथे स्वत: ला संपवलं तो स्टुडिओ बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट!

मितालीनं त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला होता. त्या फोटोमध्ये मितालीनं एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून हा फोटो शेअर करत तिनं Mommy’s gettin hot! असं कॅप्शन दिलं होतं. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मिताली आई होणार आहेस का? असं प्रश्न विचारले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.