मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने त्यांच्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं आहे. रणवीरने वादात सापडलेल्या पद्मावत सिनेमात देखील आपल्या भूमिकेने सर्वांनाच अंचबित केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलाउद्दीन खिलजीचा रोल केल्यानंतर आता रणवीर सिंग पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार आहे. सध्या रणवीर खूपच व्यस्त आहे. बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहेत की, करण जोहरच्या आगामी सिनेमात तो काम करणार आहे. अध्यात्मिक गुरू आचार्य रजनीश उर्फ ओशो यांच्या बायोपिक सिनेमात तो काम करणार आहे.


रणवीर या सिनेमात ओशो यांच्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोड्क्शन सध्या रणवीरचा सिनेमा सिम्बा देखील बनवत आहे. रोहित शेट्टी या सिनेमाला डायरेक्ट करत आहे. ओशो हे 70 च्या दशकात खूप प्रसिद्ध झाले होते.


अनेक स्टार्स त्यांचे मोठे भक्त आहेत. हा सिनेमा शकुन बत्रा हे डायरेक्ट करु शकता. आता रणवीर ओशोंच्या भूमिकेत कसा दिसणार हे पाहाणं उत्सूकतेचं ठरणार आहे. पण त्याआधी रणवीरचा गली बॉय आणि सिम्बा हा सिनेमा येणार आहे.