Ranveer Singh in Don 3 : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक फरहान अख्तरच्या डॉन ची प्रतिक्षा करत आहेत. डॉन या चित्रपटातून पुन्हा एकदा फरहान आणि शाहरुख खानची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. ते दोघे एकत्र येऊन प्रेक्षकांना या सीरिजचा तिसरा चित्रपट देणार होते. पण आता शाहरुखनं या सीरिजमधून एक्झीट घेतली आहे. कारण शाहरुखला आता कमर्शिअल चित्रपट करायचे आहेत जे जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर आता अशी बातमी समोर आली आहे की शाहरुख खानच्या जागी या चित्रपटात रणवीर सिंग दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक मीडिया रिपोर्टनुसार, फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3' मध्ये रणवीर सिंग दिसणार आहे. कथित रित्या रणवीर सिंग या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, निर्मात्यांनी यावर अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर रणवीर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. आता अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानची लेगसी पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही रणवीर सिंगची असणार आहे. चित्रपटसृष्टीतील एका सोर्सनं ट्विटरवर रणवीर सिंग डॉन 3 मध्ये दिसणार असल्याचे म्हटले आहे. तर निर्मात्यांनी रणवीर सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 6 जुलै रोजी करण्यात येईल. या चित्रपटाची घोषणा करण्याचे ठरवले आहे. तर हा चित्रपट संपूर्ण वेगळा असेल अशी आशा आहे. 



या बातमीनंतर रणवीरच्या चाहत्यांना आनंद झाला आहे, तर काही प्रेक्षक नाराज झाले आहेत. नेटकऱ्यांनी या बातमीवरून फरहान अख्तरला ट्रोल देखील केले आहे. काही नेटकरी म्हणत आहेत की या क्लासिक चित्रपटात रणवीर सिंगला घेऊन त्याची खिल्ली उडवली जात आहे. एक नेटकरी म्हणाला की मी शाहरुख किंवा रणवीर सिंगचा चाहता नाही. पण डॉनच्या भूमिकेत किंस खान हा योग्य निवड होता. ज्या प्रकारे शाहरुखन ही भूमिका साकारली होती ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले होते. रणवीरकडे अभिनय कौशल्य आहे पण शाहरुखची बॉडी लॅन्गवेज सगळ्यात जास्त बेस्ट आहे. 



हेही वाचा : श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?


दरम्यान, रणवीरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे.