मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता विकी कौशल याचे नुकतेच अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्न झालं आहे. बायकोसोबत लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा केल्यानंतर अभिनेता आपल्या कामावरती परतला आहे. मात्र आता सर्वत्र लोकांमध्ये एकच चर्चा पाहायला मिळतेय की, आज विकी कौशल दीपिकासोबत असता. परंतु बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे, याचा नेमका संदर्भ काय? काही लोकांना वाटतंय की, असं काहीतरी झालं असावं ज्यामुळे विकी कौशलचे लग्न आज कतरिनासोबत नाही तर दीपिकासोबत झालं असतं. परंतु असे काही नाही. या दोघांच्या नावाची चर्चा होतेय ती एका खास कारणासाठी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या दीपिका आणि रणवीर सिंगचा '83' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवरती सुपर हिट आहे आणि लोकांकडून या सिनेमासाठी चांगला रिसपॉन्स देखील मिळत आहे. या सिनेमामधील कास्टींग टीम ही फार मोठी आहे. या सिनेमात अनेक लहान मोठ्या कलाकारांनी काम केलं आहे. ज्यामुळे त्यांच्या अभिनयाची देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे.


परंतु तुम्हाला माहित आहे का की, या सिनेमामधील एक महत्वाची भूमिका विकी कौशल साकारणार होता. त्यासाठी त्याने ऑडिशन देखील दिलं होतं. परंतु नंतर त्याने तो करण्यासाठी नकार दिला. ज्यामुळे विकी कौशलची दीपिकासोबत काम करण्याची संधी मुकली असे लोकं म्हणत आहेत.


तसे पाहाता विकी, दीपिका आणि रणवीर हे चांगले मित्र आहेत आणि ते बऱ्यादा पार्टीत एकत्र मजामस्ती करताना दिसतात. मग विकीने का सिनेमा का नाकारला असेल? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.


विकी कौशल या सिनेमात मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार होता, ज्यांनी '83' वर्ल्डकपच्या वेळी मोठी भूमिका साकारली, ज्यामुळे त्यांना सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले होते. दिग्दर्शक कबीर खानला वाटत होतं ही विकीनं या भूमिकेसाठी काम करावं. पण नंतर विकीने नकार दिल्यामुळे त्याच्या जागेवर त्या भूमिकेसाठी साकिब सलीमची निवड करण्यात आली.


विकीनं त्याचा ‘राजी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी '83' साठी ऑडिशन दिली होती. पण नंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि विकीनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला. त्याला या चित्रपटात सह-कलाकाराची भूमिका साकारयची नव्हती. त्यामुळे दिगदर्शक कबीर खानची इच्छा असूनही विकी कौशल मात्र चित्रपटातून बाहेर पडला.


विकी कौशलनं हा चित्रपट सोडल्यानंतर कबीर खाननं मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेसाठी अभिनेता साकिब सलीम याची निवड केली. 1983 साली जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत वेस्टइंडिजच्या विरुद्ध खेळत होता तेव्हा मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावा काढल्या होत्या. याशिवाय त्यांनी वेस्ट इंडिजच्या 3 खेळाडूंना बादही केलं होतं.