फिल्मफेअर पार्टीत रणवीर सिंहने असा ड्रेस का घातला ?
बॉलीवूडच्या पार्टी असो वा कोणती प्रायवेट पार्टी, रणवीर दरवेळे इतरांपेक्षा वेगळ्याच पेहरावात दिसत असतो.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो त्याप्रमाणे आपल्या कारनाम्यासाठी प्रसिद्ध असतो.
बॉलीवूडच्या पार्टी असो वा कोणती प्रायवेट पार्टी, रणवीर दरवेळे इतरांपेक्षा वेगळ्याच पेहरावात दिसत असतो. ६३ व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड दरम्यानही तो असाच दिसून आला.
रणवीरची हटके एन्ट्री
या अॅवॉर्ड सोहळ्याला प्रत्येकाने आपआपल्या पर्सनॅलिटीप्रमाणे पेहराव केला होता.
पण रणवीरने एन्ट्री केल्यानंतर सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच खिळल्या. कोट आणि पॅंट हाच त्याचाही ड्रेस होता. पण संपूर्ण ड्रेसवर जुन्या सिनेमांचे पोस्टर्स दिसले.
फेव्हरेट सिनेमा
या संदर्भात त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नाची त्याने आपल्या अंदाजात उत्तरे दिली.
'हे माझे फेव्हरेट सिनेमा आहेत. बप्पी दा माझे फेव्हरेट संगीतकार आहेत.' असे तो म्हणाला.
दरम्यान त्याने अनेक नावे वाचून दाखविली ज्यांचे फोटो कपड्यांवर छापले होते. हे सांगत असताना तो नाचायला, गायलाही लागला.