Rapper Bad Bunny : कलाकार म्हटलं की त्याच्यात असलेली कला ही सगळ्यात महत्त्वाची असते. जर कलाकारानं त्याच्या कलेतून काही सिद्ध करून दाखवले नाही तर त्यांच्या लोकप्रियता कमी होऊ लागते. इतकंच काय तर कलाकार कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचं कोणतीही गोष्टी चोरू शकत नाही. पण असाच काहीसा प्रकार सध्या घडला आहे. हॉलिवूड लोकप्रिय आणि यंगेस्ट रॅपर बॅड बनी (Bad Bunny) सध्या चर्चेत आला आहे. बॅड बनी जो नेहमी त्याच्या रॅपिंगमुळे चर्चेत असतो. आता बॅड बनीवर त्याची एक्स गर्लफ्रेंडनं तक्रार दाखल केली आहे. बॅड बनीच्या एक्स गर्लफ्रेंडनं असं का केलं? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण... (Bad Bunny Ex Girlfriend sued Him for 330 Cr)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅड बनीच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत बॅड बनीची गर्लफ्रेंड कार्लिज डीला क्रूज असे आहे. कार्लिज डीला क्रूजच्या परवानगीशिवाय तिचा आवाज वापरल्याचे तिनं बॅड बनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. ते दोघं बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बॅड बनी आणि कार्लिज हे दोघं 2011 साली रिलेशनशिपमध्ये आले होते. तर 2016 साली ते विभक्त झाले. इतक्या वर्षांनंतर बॅड बनीवर त्याची एक्स गर्लफ्रेंडनं इतका मोठा आरोप केला आहे. 



हेही वाचा : Salman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात


रिपोर्ट्सनुसार, 'पा टी' (Pa Ti), 'डॉस मिल' या दोन गाण्यांमध्ये रॅपरनं त्याच्या एक्सगर्लफ्रेंडचा आवाज वापरला आहे. ही दोन्ही गाणी लोकप्रिय आहेत. एका गाण्याला युट्युबवर 355 मिलियन व्ह्यूज आहेत तर दुसऱ्या गाण्याला 60 मिलियन व्ह्यूज आहेत. कार्लिजनं म्हटलं आहे की बॅड बनीनं तिला दगा दिला आहे. तिला न विचारता दोन्ही गाण्यात त्यानं तिचा आवाज वापरला आहे. दरम्यान, त्याची ही दोन्ही गाणी यूट्यूबवर लोकप्रिय ठरली आहेत. 


330 कोटींचा मोबदला


रिपोर्ट्सनुसार, बॅड बनीची एक्स गर्लफ्रेंडनं त्यावर आरोप केला की त्यानं दोन्ही गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये तिचा आवाज वापरला. इतकंच काय तर ही दोन्ही गाणी तो त्याच्या प्रमोशन आणि ग्लोबल कॉन्सर्टमध्ये गातो. या संपूर्ण प्रकरणासाठी त्यानं कार्लिजकडून कोणतीही परवाणगी मागितली नाही. कार्लिजनं बॅड बनीकडे 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 330 कोटी मोबदला म्हणून मागितले आहेत.