मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) सध्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. बिग बॉस ओटीटीनंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढंच नाही तर शमिताच्या वाढदिवशीही राकेश तिच्या कुटुंबीयांसोबत दिसला. गेल्या काही दिवसांपासून राकेश आणि शमिता त्यांच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. या दोघांचा ब्रेकअप झाला अशा अनेक बातम्या समोर आल्या. दोघांनापैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश बापट आणि शमिता शेट्टीचा एक रोमान्टिक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. फोटोत राकेश शमिताला किस करताना दिसत असून शमिता लाजत असल्याचे दिसत आहे. या फोटोत राकेश कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. शमितने फ्लोरल प्रिंटेड मिडी ड्रेस परिधान केला आहे. त्या दोघांची जोडी सुपर क्यूट दिसत आहे. रिपोर्टनुसार, राकेश आणि शमिता यांच्यात मतभेद तेव्हा झाले, जेव्हा राकेश एका मुलाखतीत शमिताला 'डियर फ्रेंड' म्हणाला होता. 



हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, राकेशनं शमिताला "मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 'एक एनर्जी असते, जी दोन व्यक्तींना एकत्र आणते. आम्ही आनंदी आहोत. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. जर तुमची मैत्री चांगली असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्यावर परिणाम होत नाही. तिचं मन खूप चांगलं आहे. जे प्रामाणिक आहेत त्यांचा मी आदर करतो. आमच्या बऱ्याच आवडी निवडी सारख्या आहेत.’


याशिवाय जेव्हा त्याला तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘मी याला रिलेशनशिप म्हणणार नाही. हा एक चांगला बॉन्ड आहे. आपण फक्त एखाद्या गोष्टीला नाव देण्याच्या मागे असतो. पण हे असं आहे की, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबतचा सहवास एन्जॉय करतात. तेव्हा त्याला नाव दिलं तर तो एक नेम गेम होतो. मी शमिताचा नेहमीच आदर करतो.’