Vijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात... कॅफेत कुटुंब आणि जवळच्या मित्र-मित्रैनीसोबत झाले एकत्र स्पॉट... व्हायरल व्हिडीओ पाहता रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात...
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सतत सुरु असतात. त्या दोघांनी यावर अनेकवेळा नकार दिला असला तरी देखील सततच्या त्यांच्या डेट्स पाहता अनेकांना यावर विश्वास बसत नाही. आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यावेळी फक्त हे दोघेच नाही तर त्यांचं कुटुंब आणि काही जवळचे मित्र देखील उपस्थित होते. त्यावेळी कॅफेत ते मस्ती करत होते. अशात त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांचा हा व्हिडीओ viroshxoxo या त्याच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत विजय आणि रश्मिका या कॅफेत मस्त आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर रश्मिका आणि विजय त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्र-परिवारासोबत क्वालीटी टाईम स्पेन्ड करत असल्याचे म्हटले आहे. तर सुरुवातीला विजय आणि रश्मिका हसत जेवताना दिसत आहेत. त्या दोघांचे मित्र हे जवळपास सेम आहेत. त्याच मित्र-मैत्रिणींसोबत ते फिरताना दिसतात. या व्हिडीओत दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी, आनंद देवरकोंडा आणि शेर्या वर्मा देखील दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत की ते त्या दोघांचं कुटुंब त्यांच्या लग्नासाठी भेटत आहे. इतकंच काय तर रश्मिका आणि विजयचा भाऊ हे दोघे खूप चांगले मित्र आहेत.
रश्मिका आणि विजय या दोघांना स्पॉट करण्यात येण्याची ही पहिली वेळ नाही. तर ते याआधी बऱ्याचवेळा सुट्टी एकत्र घालवल्याचा पाहायला मिळाले आहे. इतकंच काय तक विमानतळावर आणि डिनर डेटवर देखील ते एकत्र दिसले आहेत. बऱ्याचवेळा रश्मिकानं विजयचं काही कपडे परिधान केल्याचे देखील चाहत्यांनी म्हटले आहे. तरी देखील ते दोघं नेहमी बोलतात की ते चांगले मित्र आहेत. या आधी 2023 या नवीन वर्षाचे स्वागत त्या दोघांनी एकत्र केल्याचे म्हटले जात होते. त्या दोघांनी नवीन वर्षाच स्वागत केल्याचे काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये साम्य असल्याचे अनेकांनी म्हटले.
हेही वाचा : फुगड्या खेळण्यापासून किर्तन ते स्वयंपाक करण्यापर्यंत प्राजक्ता गायकवाड वारी जगली; Video पाहिले का?
दरम्यान, 'डियर कॉमरेड' आणि 'गीता गोविंदम' या चित्रपटांमधील केमिस्ट्री पाहता त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. तर त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रश्मिका लवकरच 'एनिमल्स' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.