रणबीर कपूरने असं काय केलं ज्यामुळे ढसा ढसा रडू लागली Rashmika Mandanna?
रणबीर कपूरसोबत असताना Rashmika Mandanna वर का आली रडण्याची वेळ?
मुंबई : टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याचा जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. रश्मिका लवकरच 'गुड बाय' (Good Bye) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच रश्मिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिच्याबद्दल रोज एक नवीन चर्चा रंगत असते. आता अभिनेत्रीची एक रंजक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूरबद्दल (Ranbir Kapoor) बोलताना दिसत आहे.
रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर लवकरच 'अॅनिमल' (Animal) सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांनीही काही काळापूर्वी एकत्र सिनेमाचं शूटिंग केले आहे. आता एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदान्नाने सिनेमाच्या दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा रश्मिका सिनेमाच्या सेटवर रणबीर कपूरमुळे रडू लागली.
का रडू लागली रश्मिका?
रश्मिका म्हणाली, ' सिनेमाचं शूटिंग सुरू असताना मी नाश्त्याबद्दल तक्रार करत होती. दुसऱ्या दिवशी रणबीरने माझ्या नाश्त्याची व्यवस्था केली. त्याने त्याच्या शेफला माझ्यासाठी नाश्ता बनवायला लावला, ते पाहून मी भावूक झाली आणि रडली की कोणी इतके चांगले कसे असू शकतं.' (rashmika mandanna instagram)
तेव्हा रणबीरने त्याच्या शेफला रश्मिकाच्या आवडीचे पदार्थ बनवण्यासाठी सांगितले. रणबीर घेत असलेली काळजी पाहून रश्मिकाच्या डोळ्यात पाणी आलं.
रश्मिकाचे आगामी सिनेमे (rashmika mandanna upcoming movies)
रश्मिका लवकरचं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' अभिनेता टायगर श्रॉफसोबत 'रॅम्बो' सिनेमात दिसणार आहे. त्याचबरोबर सध्या अभिनेत्री 'गुडबाय' आणि 'अॅनिमल' सिनेमांमुळे चर्चेत आहे.