मुंबई : 'KGF' ने यशला देशातील सर्वात यशस्वी स्टार बनवलं आहे. यशच्या स्टारडमच्या वाढीमुळे तो सर्वांचा आवडता स्टार बनला आहे. यशला 'KGF Chapter 1' मधून 'Angry Young Man' ही पदवी मिळाली आणि 'KGF Chapter 2' ने त्याला पॅन इंडियाचा सुपरस्टार बनवलं. 'KGF 2' ने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडले आणि रिलीज झाल्यानंतर एका महिन्यानंतरही बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. पण एकदा रश्मिका मंदान्ना यशबद्दल काहीतरी असं बोलली होती. त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकाने यशबद्दल असं म्हटलं होतं
'KGF' स्टार यशने 2007 मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपट जंबडा हुडुगीद्वारे केली. जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्याचबरोबर रश्मिका मंदान्नाने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं. 2017 मध्ये रश्मिका मंदान्नाने यशला शोऑफ अभिनेता म्हटलं होतं. त्यानंतर तो खूप ट्रोलही झाला होता.


भड़क होते यशचे फँन्स
एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदान्नाला विचारण्यात आलं होतं की, कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिस्टर शोऑफ कोण आहे? या प्रश्नाला उत्तर देत तिने लगेच यशचं नाव घेतलं, जे अभिनेत्याच्या चाहत्यांना आवडलं नाही आणि ते रश्मिका मंदान्नावर भडकले. अभिनेत्री यशचा अपमान केल्याचा आरोप चाहत्यांनी सुरू केला. अनेकांनी तिला अहंकारीही म्हटलं.


मोठी पोस्ट लिहून मागितली माफी 
रश्मिका मंदान्नाने फेसबुकवर एक लांबलचक मोठी पोस्ट लिहून माफी मागितली. तिने लिहिलं की, 'मी यश सर किंवा इतर कोणाचाही अनादर केलेला नाही. यश सरांचं, त्यांच्या प्रतिभेचे आणि ते अनेक प्रसंगी लोकांना कसे प्रेरित करतात याचं मी नेहमीच कौतुक केलं आहे.


खेदाची गोष्ट म्हणजे, मी त्यावेळी 'संथू स्ट्रेट फॉरवर्ड' या चित्रपटाबद्दल बोलले होते, ज्याचा मला सर्वाधिक आनंद झाला होता. याकडे मीडियाने दुर्लक्ष केलं. जेव्हा तुम्ही शोच्या सर्वात गंभीर नसलेल्या भागातून फक्त दोन ओळी संपादित करून शो फिरवता, तेव्हा संपूर्ण सारं गमावलं जातं. हे खरंच दु:खद आहे'.


'मी नेहमीच त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे'
तिने पुढे लिहिलं की, 'हे माझं विधान नव्हते तर एक रॅपिड फायर गेम होता आणि तिची स्तुती आणि त्याच्याबद्दल मी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी ही गोष्ट गांभीर्याने घेईन असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. 


माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा. माझा तसा काहीच हेतू नव्हता. मी माझ्या तुम्हाला आणखी मुलाखती आणि फेसबुक लाईव्ह पाहण्याची विनंती करते. ज्यामध्ये मी यश सरांच्या कामाची प्रशंसा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे.