मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदाना ओळखली जाते. ती सगळ्यांची 'नॅशनल क्रश' बनली आहे. रश्मिकाच्या एका स्माईलवर तिचे चाहते फिदा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिका सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. ती नेहमीच आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती एका जवळच्या व्यक्तीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. 


रश्मिका तिचा मेकअप बरोबर झाला आहे का असा प्रश्न या व्यक्तीला विचारत असल्याचं बोललं जात आहे. रश्मिका तिच्या साध्या आणि स्वीट लूकमुळे नेहमीच सगळ्यांच लक्षवेधून घेते.


आता तिने शेअर केलेल्या फोटोत ती व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. ती आईसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत आहे. 



ती आईला आपल्या मेकअप बद्दल सांगताना दिसत आहे. तिच्या आईला रश्मिकाचा हा लूक आवडला आहे. माय-लेकींचा हे सेशन सध्या चांगलंच चर्चेत आहे.