`माझ्या नवऱ्याची बायको` मालिकेतून शनायाची एक्झिट?
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका `माझ्या नवऱ्याची बायको` मधील शनाया अर्थात रसिका सुनिल मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील शनाया अर्थात रसिका सुनिल मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. खरंतर शनायाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. आणि रसिका सुनीलचा मस्तीखोर, नटखट अंदाज सर्वांना भावत आहे. त्याचबरोबर ही मालिका आता महत्त्वाच्या रंजक टप्प्यावर असून मालिकेतून जर शनायानं एक्झिट घेतली तर...?
यासाठी सोडणार मालिका
पण सध्या तशी चर्चा सुरु आहे. रसिका फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला जाणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून मालिकेतून जर शनायानं एक्झिट घेतली तर काय करायचं असा प्रश्न निर्मात्यांसमोर उभा राहिलाय. त्याचबरोबर नवीन शनाया कोण असणार? आणि ती शनाया हे पात्र रसिका इतकंच खुमासदार पद्धतीने रंगवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यापूर्वी रंगल्या होत्या या चर्चा
यापू्र्वीही शनाया मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. शनायाला सिनेमांच्या ऑफर्स येत असल्याने ती मालिका सोडणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.