Entertainment News : रतन राजपूत (Ratan Raajputh) हे टि.व्ही इडंस्ट्रीमधील (Television Industry) प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. प्रसिद्ध होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकदा वाईट अनुभवातूनही जावं लागते. रतनला तिच्या करिअरच्या सुरुवातीला असाच एक वाईट अनुभव आला होता. इडंस्ट्रमध्ये आल्यावर तिला खूप वाईट अनुभवातून जावं लागलं. इडंस्ट्रीमध्ये काही लोकांनी इतकी वाईट वर्तणूक दिली त्या विषयी सांगताना आज ही तिला रडू कोसळते व राग येतो. (Ratan Raajputh actress had to face the casting couch offered by a 60 year old producer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या शहरातून किंवा खेड्यातून मूली आपली स्वप्न (Dream) पूर्ण करायला मुबंईला (Mumbai) येतात तेव्हा त्यांना 'कास्टींग काऊच'चा (casting couch) सामना त्यांनाा करावा लागतो. इडंस्ट्रीमध्ये गॉडफादर (Godfather) असल्यास या संकटांना सामोरे जावं लागत नाही. पण आता अनेक अभिनेत्री यावर उघडपणे भाष्य करताना दिसतात. 


रतन राजपूत ही यूट्यूबला व्लॉग च्या माध्यामातून चांगलीच सक्रीय असते. आयुष्यातील सगळ्याच बारिक सारिक गोष्टींचे ती अपडेट्स तिच्या चाहत्यांना नेहमीच देते. व्लॉग च्या माध्यामातून तिच्या आयुष्यातील कडवे अनुभव देखील सांगते. काहीवेळा ती धक्कादायक खुलासे करून सर्वांना आश्चर्यचकित करते.


रतनचा धक्कादायक खुलासा
रतन ने तिच्या नुकत्याच यूट्यूब व्लॉग मध्ये एक किस्सा सांगत धक्कादायक खुलासा केला. रतन सांगते की, 2008 ला ती मुंबईत आली होती. तेव्हा ती साधी सरळ होती. तिला मेकओव्हर हा प्रकारच माहित नव्हता. काम मिळावं या धडपडीत असताना ती एका मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये गेली. तिथे एक 60 ते 65 वयातला एक  प्रोड्यूसर बसला होता. 


त्या प्रोड्यूसरने तिला सांगितले की, तुला खूप बदलावं लागणार... तुझे केस, तुझी त्वचा, तुला कपडे घालण्याची अक्कल नाही, मेकओव्हर हा प्रकार तुला माहित नाही तुला पाहिल्यावर असे वाटते की आमच्या प्रोडक्शनला 2 ते 2.5 लाखांचा खर्च करावा लागेल... पण आम्ही तुझ्यावर इतकी खर्च का करायचा? तु मला गॉडफादर बनव आणि माझ्यासोबत मैत्री कर. 



आणखी वाचा... Raju Srivastav : तारक मेहताने 'या' नावाने सेव्ह केला होता राजू श्रीवास्तवचा नंबर, सांगितलं त्यामागचं कारण


तिने प्रोड्यूसरला नकार दिला


रतन ने त्या प्रोड्यूसरला उत्तर दिले की, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात मी तुमचा खूप आदर करते. तुम्ही जसे मार्गदर्शन कराल तसेच मी वागेल. त्यावर ती व्यक्ती रागात म्हाणाली, इथे तुझ मार्गदर्शन करायला कोणी फुकट बसले नाही, तुला जर अभिनेत्री व्हायचे असेल तर हे नखरे इथे करुन चालणार नाही. थोडी स्मार्ट हो.. अर्धा तास तो प्रोड्यूसर रतनसोबत बोलत होता. 


बोलता बोलता त्या व्यक्तीने असं काहीसं बोला की, ते ऐकून रतनला धक्काच बसला...ती व्यक्ती म्हणाली की, 'तुझ्या जागी माझी मुलगी असती आणि तिला जर अभिनेत्री व्हायचे असते तर मी तिच्यासोबत ही झोपलो असतो'. हे ऐकताच रतन तिथून निघाली. 


त्या व्यक्तीने तिच्यासोबत वाईट कृत्य केले नाही पण त्याच ते वाक्य मात्र तिच्या मनात घर करुन गेले. त्या संभाषणानंतर रतन मानसिक रित्या ढासळली होती. तिला त्यातून बाहेर पडायला 1 महिना लागला. त्या घटनेनंतर रतन ने कोणत्याच चित्रपटासाठी प्रयत्न केले नाहीत. 


रतन म्हणते की, आज ही जर ती व्यक्ती मला कुठे भेटली तर मी तिला चप्पलीने मारेल... आपल्या मूलीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करणे लज्जास्पद आहे. अशा प्रकारची व्यक्ती किती वाईट असेल याची कल्पना करणे देखील कठीण आहे. 


रतन राजपूत ने सांगितले की, इडंस्ट्रीमध्ये (Industry) काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करु नका. स्वत:ची अशी किंमत देऊ नका की, तुम्ही यशस्वी झाल्यावर त्याचा पश्चाताप होईल. आयुष्यात नाव कमवायचे असल्यास मेहनतीच्या जोरावर कमवा त्याचे समाधान ही जगा वेगळं असेल.


आणखी वाचा... Amazon - flipkart वर Offers ची दिवाळी, पाहा स्वस्तात काय काय मिळतंय...