Amazon - flipkart वर Offers ची दिवाळी, पाहा स्वस्तात काय काय मिळतंय...

Flipkart Big Billion Days Sale, Amazon Great Indian Festival मध्ये नेमकं खास काय, हे एकदा पाहाच....

Updated: Sep 22, 2022, 01:31 PM IST
Amazon - flipkart वर Offers ची दिवाळी, पाहा स्वस्तात काय काय मिळतंय...  title=
Amazon Great Indian Festival Flipkart Big Billion Days Diwali sales

Amazon - flipkart Sale : आपल्या देशाला सणांचा देश म्हाणून ओळखले जाते. हीच संधी साधत असंख्य ई कॉमर्स साईट खरेदीच्या धमाकेदार संधी तुमच्याससाठी घेऊन येतात. काहीजण तर या सेलची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्याही दोन आघाडीच्या ई कॉमर्स साईट अशाच दणदणीत ऑफर्स घेऊन आल्या आहेत. Flipkart Big Billion Days Sale, Amazon Great Indian Festival मध्ये नेमकं खास काय, हे एकदा पाहाच.... (Amazon Great Indian Festival Flipkart Big Billion Days Diwali sales)

1. iPhone 13 आणि iPhone 12
नुकताच आयफोन 14 लाँच झाला आहे. तुम्हाला माहितच असेल की Apple च्या iPhone ची कोणतीही सीरिज जेव्हा भारतात लाँच होते तेव्हा जुन्या सीरीजच्या किंमतीत कपात पाहायला मिळते. मागील वर्षी लाँच झालेला  iPhone 13 ची किंमत फ्लिपकार्ट वर 69,990 रुपयांच्या ऐवजी 49,990 रुपये इतकी आहे. बँक ऑफर्स आणि अन्य ऑफर्स चा विचार केल्यास iPhone 13 वर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. 
iPhone 12 ची किंमत अॅमेझॉन  वर 39,999 रुपये इतकी आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्सचा विचार केल्यास iPhone 12 च्या किंमतीत अजुन कपात पाहायला मिळेल.

2. Google Pixel 6a
गूगल पिक्सल हा मोबाईल स्टॉक एंड्रॉइड (Stock Android) आणि सॉफ्टवेअर अपडेट (Softwear Update) या दोन गोष्टींसाठी चांगलाच ओळखला जातो. या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये आहे पण हाच स्मार्टफोन फ्लिपकार्ट (Flipcart) ऑफर्सला फक्त 27,699 रुपयांना मिळत आहे. या ऑफर्समध्ये एक्सचेंज बोनस , बँक ऑफर (Bank Offer), प्रीपेड ऑर्डर आणि स्पेशल डिस्काउंट्स (Special Discount) चा समावेश आहे.

3. Nothing Phone (1)
वनप्लस  मधील Carl Pei ने डेवलप  केलेल्या या फोनची मार्केटमध्ये आधीपासूनच चर्ची होती. Big Billion Days Sale मध्ये या फोनची किंमत 28,999 रुपये इतकी आहे. या फोनच्या सध्याची किंमत 33,999 रुपये आहे. ऑफर्समध्ये या फोनची किंमतीवर 5,000 रुपये इतकी सूट मिळते.  याव्यतिरिक्त इतर स्मार्टफोन्सवर ऑफर्स ची कमी नाही. रियलमी 9 प्रो+ 17,999 रुपये, मोटो G62 14,499 रुपये, पोको का मिड-रेंज 5G फोन पोको F4 सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. जर तुम्ही बजेट सेगमेंट मध्ये चांगल्या फीचर्सचा विचार करत आहात तर Redmi 10 फक्त 10,000 रुपयांत मिळेल.

आणखी वाचा... Nokiaचा तगडा जबरदस्त बॅटरीचा Tablet, भन्नाट फीचर्स आणि बरचं काही...

4. Noise Pulse 2 स्मार्टवॉच
कोरोनानंतर प्रत्येकजण आपल्या आरोग्याला घेऊन थोडी जास्त काळजी घेतात. यामध्ये स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड चांगलेच आपली मदत करतात. अॅमेझॉनवर Noise Pulse 2 Max Advanced या स्मार्टवॉचवर 67% डिस्काउंट मिळाल्यावर फक्त 1999 रुपयांना ही स्मार्टवॉच खरेदी करु शकता. सध्या बाजारात असलेली किंमत 5,999 रुपये आहे. 

5. Blaupunkt Wireless Earbuds
गाणी ऐकायची असल्यास किंवा मित्र मंडळीसोबत गप्पा करायच्या असल्यास  वायरलेस ईयरबड्स शिवाय मजा नाही. Amazon Great Indian Festival मध्ये तुम्हाला बिल्ट इन इन ईयर माइक्रोफोन, टर्बोवॉल्ट फास्ट चार्जिंग वाले Blaupunkt Wireless Earbuds मात्र 999 रुपयांना मिळतील. 

6. Apple MacBook Air M1
सगळ्यानांच Apple MacBook घेण्याची इच्छा असते. पण आपल्या बजेटच्या बाहेर याची किंमत जात असल्यामुळे सगळ्यानांच  Apple MacBook घेणे शक्य होत नाही. पण  Flipkart Big Billion Days Sale मध्ये  Apple MacBook Air M1 तुम्ही हा लॅपटॉप 70 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. बाजारात 16GB वेरिएंटच्या या लॅपटॉपची  किंमत 1 लाख 19 हजार 900 इतकी आहे. 

7. स्मार्ट टि्व्ही
Amazon वर 5,499 रुपयांपासून  स्मार्ट टि्व्हीची सुरुवात आहे. बजट सेगमेंट मध्ये तुम्ही Westinghouse च्या Pi सीरीजचा विचार करु शकता. याची सुरुवातीची किंमत 8,499 रुपये इतकी आहे. 

या यादीतील वस्तूंच्या बाबतीत कदाचित फायनल ऑफरच्या किंमतीत बदल होऊ शकतात. सेलच्या नावावर फसवणूक करणारे देखील सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका. तुमच्या बजेटनुसार खरेदी करा.

आणखी वाचा... UPI Payment आता इंटरनेट-पिनला बाय-बाय करा, हा एकदम Free वाला सुरक्षित पर्याय