लग्न नीता अंबानीच्या मुलाचं, पण मंडपात चर्चा `या` बॉलिवूड अभिनेत्रीचीच
साध्या ड्रेसमध्ये कतरिनाने सगळ्यांच लक्षवेधून घेतलं होतं.
मुंबई : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या प्रत्येक पार्टीची आणि लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा होते. या कार्यक्रमातील शाही अंदाज सगळ्यांचं लक्षवेधून घेणारा असतो.
सोबतच अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जबरदस्त आणि हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही टक्कर देईल अशी स्टाईल अंबानी कुटुंबातील सदस्य करतात.
मोठमोठ्या पार्टींमध्ये अंबानी कुटुंब जेव्हा पोहोचतं. तेव्हा त्यांच्या फॅशनची सर्वाधिक चर्चा रंगते. या कुटुंबातील महिलांनी साडी नेसलेली असो किंवा सुंदर लेहेंगा, त्यांचा रॉयल लुक नेहमीच लक्षवेधी ठरतो.
पण अंबानी कुटुंबाच्या अनेक सोहळ्यांमध्ये बॉलिवूड कलाकार आवर्जून हजेरी लावताना दिसतात. त्यात आता आकाश अंबानी यांच्या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने पेस्टल पिंक कलरचा पोशाख परिधान करत हजेरी लावली होती, ती या ड्रेसमध्ये अगदी सिल्म दिसत होती. साध्या ड्रेसमध्ये कतरिनाने सगळ्यांच लक्षवेधून घेतलं होतं.
आकाश अंबानीची पत्नी जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा तिने पिंक कलरचा गाऊन परिधान केला होता. ज्याची तुलना कतरिनाच्या ड्रेससोबत झाली. त्यावरुन कतरिनाने साध्या ड्रेसमध्ये सोहळ्याला हजेरी लावत नीता अंबानी यांच्या सूनाला चांगलीच टक्कर दिली असं बोललं जात आहे.